पवित्र रिश्ता या मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण त्यासोबत नंतर अंकिता आणि सुशांत हे दोघेही एकत्र आले होते.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनं बॉलिवूड आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांत सिंह राजपूतला सर्वात आधी ओळख मिळवून दिली आणि घराघरात पोहोचलं ते झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेने.
या मालिकेचं प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशा गारूड निर्माण झालं होतं. याच मालिकेत सुशांतसोबत प्रमुख भूमिकेत होती ती अभिनेत्री अंकिता लोखंडे.
पवित्र रिश्ता या मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण त्यासोबत नंतर अंकिता आणि सुशांत हे दोघेही एकत्र आले होते.
छोट्या पडद्यावर हिट ठरलेल्या या जोडीच्या अफेअरची मोठी चर्चाही झाली. मात्र नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशात-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर सुशांत बराच काळ खचलेल्या मानसिकतेत गेला होता. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडे हिची एका बिझमनसोबत एंगेजमेन्ट झाली आहे.
मात्र सुशांतच्या आत्महत्येबाबत अंकितालाही माहिती नव्हती. जेव्हा तिला न्यूज चॅनलमधून फोन आला, तेव्हा तीलं कळलं. सुशांतबाबत ऐकल्यानंतर अंकिता सुन्न झाली.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतनं आपल्या मुंबईतील घरात आत्महत्या केली. या बातमीनं बॉलिवूडबरोबरच संपूर्ण देश शोक व्यक्त करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्यामुळं नैराश्यातूनच सुशांतनं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. फक्त सुशांतच नाही याआधीही नैराश्यातून या बॉलिवूड कलाकारांनी आत्महत्या केली.
2019च्या अखेरीस कुशल पंजाबी या टीव्ही अभिनेत्यानं आत्महत्या केली. त्यानही नैराश्यातून आत्महत्या केली होती.
2016मध्ये बालिका वधू फेम अभिनेत्री प्रत्युषा बनर्जीनं राहत्या घरी आत्महत्या केली होती. बॉयफ्रेंण्डसोबत ब्रेकअप झाल्यानंतर प्रत्युषानं टोकाचं पाऊल उचललं होतं.
2013मध्ये बॉलिवूड अभिनेत्री जिया खानने तिच्या मुंबईतील घरात आत्महत्या केली. अवघ्या 25 वर्षीय जियाने जेव्हा हे पाऊल उचलले तेव्हा ती गर्भवती होती. या प्रकरणात अभिनेता आदित्य पंचोली यांचा मुलगा सूरज पंचोली यांचे नाव समोर आलं होतं. जिया खानने निशब्द, हाऊसफुल, गजनी यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते.
बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारतीच्या मृत्यूला कसे विसरता येईल. वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी डझनभर हिट चित्रपटात काम करणार्या दिव्याचे 1993मध्ये घराच्या पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. दरम्यान आजही दिव्या भारती यांनी आत्महत्या केली की तो अपघात होता, याबाबत सत्य समोर आलं नाही आहे.
प्रसिद्ध अभिनेता गुरुदत्त यांच्या मृत्यूनं सारा देश हळहळला होता. दरम्यान, त्यांनी आत्महत्या केल्याचं स्पष्ट नाही झालं. मात्र ऑक्टोबर 1964 मध्ये ते घरात मृत्यूमुखी पडलेले सापडले. दारूच्या नशेत झोपेच्या गोळ्या घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते.
वियजलक्ष्मी वदलापती उर्फ सिल्क स्मितानं सप्टेंबर 1996मध्ये गळफास लावत आत्महत्या केली. तिनं एक सुसाइड नोटही लिहिली होती. या सुसाइड नोटमध्ये तिनं सतत अपयशामुळे आत्महत्या करत असल्याचं सांगितले.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री परवीन बाबी यांनी 2005मध्ये आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. परवीन बाबी मुंबईत एकट्या राहत होत्या, घराबाहेर दूध आणि वृत्तपत्रे पाहिल्यानंतर शेजाऱ्यांना संशय आला. मात्र दार उघडेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
2004 साली मिस इंडिया विजेती नफीसा जोसेफनं आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. नफीसाचा मृत्यू थक्क करणारा होता, कारण तिनं लग्नाच्या काही दिवसांआधी आत्महत्या केली.