JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / "प्रेमात एक वर्षानंतर एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो", रिया चक्रवर्तीचा VIDEO VIRAL

"प्रेमात एक वर्षानंतर एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो", रिया चक्रवर्तीचा VIDEO VIRAL

रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत महेश भट्टदेखील (Mahesh Bhatt) तिच्यासह आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणी दररोज नवनवे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) आणि दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचा व्हॉट्सअॅप चॅट समोर आला होता. आता त्यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. रिया चक्रवर्तीचा हा व्हिडीओ तिच्या जलेबी फिल्मच्या प्रमोशनाच्या वेळेचा असल्याचं समजतं आहे. यामध्ये महेश भट्ट रियाचा हात धरून उभे आहेत आणि रिया प्रसारमाध्यमांशी प्रेम, नातेसंबंध याबाबत बोलते आहे.

रिया म्हणतेय, “एक किंवा दोन वर्षांनंतर एक अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला एकमेकांना मारून टाकावंसं वाटतं किंवा बदलावंसं वाटतं. हे सामान्य आहे आणि याचं एक चक्र असतं. माझ्या मते, प्रेमात जवळीक वाढली आहे, ते खूप खोल असं झालं आहे, ते खूप रिअल झालं आहे. याचा अर्थ असाही होतो की मी आयुष्यभर सिंगलच राहेन” हे वाचा -  “पद्मश्री काढून घ्या सांगायला राष्ट्रपती आहेस?” नसिरुद्दीन यांनी कंगनाला सुनावलं 8 जून रोजी सुशांतच घर सोडल्यानंतर रियाने महेश भट्ट यांना व्हॉट्सअॅप मेसेज केला होता. हा मेसेजही व्हायरल झाला. या चॅटिंगमध्ये रियाने रियाने पहिला मेसेज मूव्ह ऑन असा केला आहे. जिलेबी या चित्रपटात रिया चक्रवर्तीच्या भूमिकेचं नाव आयशा आहे. आज तक यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जड अंतकरणाने मी पुढे जात आहे, असंही तिनं म्हटलं होतं. रियाच्या मेसेजवर महेश भट्ट यांनी तुझे वडील या निर्णयाने खूश होतील, अशी प्रतिक्रिया दिली होती. याशिवाय आता मागे वळून पाहू नकोस, असंही त्यांनी रियाला सांगितलं होतं. हे वाचा -  सुशांत सिंह प्रकरणात मोठी अपडेट; रिया व महेश भट्ट यांचा व्हॉट्सअॅप चॅट आला समोर सध्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणाने वेग घेतला आहे. सीबीआयचे अधिकारी गुरुवारी मुंबईत दाखल झाले. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविल्यानंतर तपास अधिक वेगाने होईल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. सीबीआयने यासाठी एका एसआयटीचं (SIT) गठन केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार रियाला कोणत्याही क्षणी सीबीआयकडून चौकशीकरता बोलावण्यात येऊ शकते. त्याचप्रमाणे रिया-सुशांतचा मित्र असणारा महेश शेट्टी (Mahesh Shetty) याला देखील सीबीआय चौकशीसाठी बोलावू शकते. मृत्यूपूर्वी सुशांतने महेश शेट्टीला फोन केला होता. महेश नंतर त्याने रियाला देखील फोन केला होता. त्यामुळेच या दोघांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या