सुशांत सिंह राजपूत (sushant singh rajput) मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीवर (rhea chakraborty) सुशांतच्या कुटुंबाने अनेक आरोप लावले आहेत. सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जातं आहे. त्याच सोशल मीडियावर अनेक अभिनेत्रींनी रियाला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) प्रकरणात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) वादात आहे. सुशांतच्या मृत्यूनंतरत सोशल मीडियावर ट्रोलर्सनी तिला ट्रोल केलं आणि आता सीबीआई (CBI), ईडी (ED), एनसीबी (NCB) या तीन केंद्रीय यंत्रणा या प्रकरणात तपास करत आहेत. रियाला चौकशीला सामोरं जावं लागतं आहे. आरोपांनी घेरलेल्या रियाच्या समर्थनार्थ काही अभिनेत्री उतरल्या आहेत. त्यांनी रियाला पाठिंबा दिला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि फरहान अख्तरची गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) ने रियाच्या समर्थनार्थ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. रियाला तिच्या वयाच्या 16 व्या वर्षांपासून आपण ओळखत असल्याचं म्हणत शिबानीने तिची बाजू मांडली आहे. रिया मजबूत, जिवंत आणि उत्साहाने आयुष्य जगणारी आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये तिच्या व्यक्तिमत्वाच्या विरोधात मी तिला पाहिलं आहे.
टीव्हीवरील सरळ-साधी सून ते आता नागिन बनलेली हिना खान (Hina Khan) एका न्यूज पोर्टलशी बोलताना म्हणाली, सध्या सीबीआयला या प्रकरणाचा तपास करायला द्यायला हवा आणि त्याच्या निष्कर्षाची प्रतीक्षा करायला हवी. या प्रकरणात थेट रियावर आरोप केले जात आहेत. ज्याचा परिणाम तिच्या करिअरवर पडू शकतो. कदाचित ती कुणाचा सामनाच करू शकणार नाही, अशी अवस्था तिची होईल. सर्वजण सत्यासाठी लढत आहेत, जस्टिस फॉर सुशांत'. पण असं नाही आहे.
प्रत्येक बाबतीत सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देणारी अभिनेत्री स्वरा भास्कर याला मीडिया ट्रायल म्हणाली. रिया चक्रवर्ती ज्यापद्धतीने मीडिया ट्रायलचा सामना करत आहे तसं कसाबलाही मीडियावर इतकं witch-hunt झेलावं लागलं नसेल. हे खूप लज्जास्पद आहे.
तर रियावरील आरोप सिद्ध होईलपर्यंत तिला दोषी मानू नका. सुशांत प्रकरणाचा मीडियाने सर्कस करू नये आणि कायद्याला आपलं काम करू द्यावं असं आवाहन केलं आहे. "सुशांतच्या मृत्यूनंतर हे प्रकरण मीडिया सर्कस बनणं दुर्दैव आहे. याच आयुष्यात एक महिला म्हणून रियाचा होत असलेला तिरस्कार पाहून माझं हृदय तुटतं आहे. तिच्यावरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत ती निर्दोष नाही की आता जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही दोषी असता असं आहे. नागरिकांनी कायद्याच्या अधिकाराचा मान राखा आणि कायद्याला आपलं काम करू द्यावं", असं विद्या बालन म्हणाली.
तर दाक्षिणात्य अभिनेत्री लक्ष्मी मंजू म्हणाली, मला सत्य माहिती नाही, सत्य जाणून घ्यायचं आहे. लवकरच सत्य समोर येईल. मात्र तोपर्यंत इतकी क्रुरता आणि एखाद्या माणसाला, त्याच्या कुटुंबाला कोणत्याही तर्काशिवाय शिवीगाळ करणं आपण बंद करू शकत नाही का? मी रियासाठी तिच्या बाजूने उभी होते आहे.