सनीला तिच्या प्रवासात उत्तम साथ दिली ती तिचा पती डेनिअल वेबरने. सुख, दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात दोघांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही.
बॉलिवूडमध्ये असे अनेक चेहरे आहेत ज्यांना सिनेसृष्टीत काम करून अनेक वर्ष झाली तरी त्यांची ओळख सांगावी लागते. पण या सगळ्याला अपवाद ठरली ती सनी लिओनी.
अवघ्या काही वर्षांच्या करिअरमध्ये सनीने स्वतःचं असं भक्कम स्थान बॉलिवूडमध्ये निर्माण केलं. शुन्यातून करिअर उभं कसं करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणून सनी लिओनीकडे पाहता येईल.
सनीला तिच्या प्रवासात उत्तम साथ दिली ती तिचा पती डेनिअल वेबरने. सुख, दुःखाच्या प्रत्येक प्रसंगात दोघांनी एकमेकांची साथ कधी सोडली नाही. सुरुवातीला वर वरचं वाटणार हे नातं किती पक्कं आहे हे दोघांनी काहीही न बोलता दाखवून दिलं. 2011 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नाच्या सहा- सात वर्षांनंतर सनीने निशा या मुलीला दत्तक घेतलं. त्यानंतर दोघांनी सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना जन्म दिला.
उत्तम करिअर, चांगला नवरा, गुणी मुलं हे सगळं काही मनासारखं असतानाही आपले पाय जमिनीवर ठेवून छोट्यात छोट्या गोष्टींमधून कसा आनंद मिळवायचा हे सनी तिच्या चाहत्यांना तिच्या कृतीतून दाखवतच असते.
सनी तिचे आणि पती डॅनिअल वेबरसोबतचे अनेक फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत असते. यावेळीही तिने डॅनिअलसोबतचे दोन फोटो शेअर केले. या फोटोंना तिने कॅप्शन जरी दिली नसली तरी तिच्या या फोटोवरून ती गरोदर असल्याचा संशय तिच्या चाहत्यांना येत आहे.
एका फोटोमध्ये सनी आणि डेनिअल एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये डॅनिअलने त्याचा हात सनीच्या पोटावर ठेवला आहे. तर सनीच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे हावभाव पाहायला मिळत आहेत. तर डॅनिअलच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत आहे.
नेमकी याच फोटोवरून ती गरोदर तर नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अभिजीत चॅटर्जी या युझरने फोटोवर कमेंट करत म्हटलं की, ‘ती मुलांनंतर पुन्हा एकदा गरोदर. अभिनंदन सनी.’
आता ती खरंच गरोदर आहे की नाही हे तर सनीच सांगू शकेल. पण सध्या सनी आणि डॅनिअल दोघं सर्वात जास्त आनंदी आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही.