27 नोव्हेंबर : अभिनेत्री सनी लिओनच्या सहकाऱ्यानं तिच्या अंगावर साप टाकला होता. तिचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला होता. पण शांत राहील ती सनी कसली? आपल्या सहकाऱ्याचा बदला घेण्याचा प्लान तिनं केला. आणि बदला घेतलाही. सहकाऱ्याच्या या मस्करीचा गोड बदला सनीनं घेतलाय. तिनं काय केलंय ठाऊकेय? सनीनं साप टाकणाऱ्या तिच्या सहकाऱ्याच्या डोक्यात केक घातला. सनीनं हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलाय. व्हिडिओ टाकताना हा बदला असल्याचं तिनं आवर्जून नमुद केलं. सनीचा हा गोड बदलाही चर्चेचा विषय ठरलाय.