JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मै तेरा जबरा फॅन! शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा

मै तेरा जबरा फॅन! शिल्पकारानं साकारला सुशांत सिंह राजपूतचा मेणाचा पुतळा

मै तेरा जबरा फॅन! सुशांतचा जबरदस्त चाहते असलेले सुकांतो रॉय यांनी मेणाचा हुबेहुब पुतळा साकारला आहे.

0105

सुशांत सिंह रजपूतने 14 जून रोजी आत्महत्या केल्यानंतर बॉलिवूड विश्वाला मोठा धक्का बसला होता. सुशांतनं आत्महत्या केली की हत्या झाली याचा सध्या वेगवेगळ्या पद्धतीनं तपास सुरू आहे.

जाहिरात
0205

सुशांतच्या अचानक जाण्यानं चाहत्याना आणि मनोरंजन विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. सुशांतला कोणीच विसरू शकणार नाही.

जाहिरात
0305

पश्चिम बंगालमध्ये सुशांत सिंह रजपूतचे अनेक चाहते आहेत त्यापैकीच एका शिल्पकारनं त्यांचा पुतळा साकारला आहे. त्यांनी सुशांतची कमतरता भरून काढण्यासाठी खास मेणाचा हुबेहुब पुतळा तयार केला.

जाहिरात
0405

पश्चिम बंगालमधील आसनसोल इथे राहणारे शिल्पकार सुकांतो रॉय यांनी सुशांतचा मेणाचा पुतळा साकरला. 'मला सुशांत खूप आवडतो, तो आता या जगात नाही', अशा शब्दात रॉय यांनी आपली हळहळ व्यक्त केली.

जाहिरात
0505

हा पुतळा त्यांनी आपल्या संग्रहालयात ठेवण्यासाठी तयार केला आहे. हा अप्रतिम साकारलेला पुतळा पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे. सुशांतचा मेणाचा पुतळा पाहून त्याच्या आठवणी ताज्या करण्याचा प्रयत्न चाहते करत आहेत. सुशांतच्या कुटुंबियांना देखील अशा पद्धतीचा मेणाचा पुतळा हवा असेल तर तो तयार करून देण्याची ऑफर देखील रॉय यांनी दिली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या