मराठीतला हरहुन्नरी अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) 45 वर्षांचा झाला आहे. त्याने संपादन केलेलं यश सहज मिळालेलं नाही. त्यासाठी त्याला अपार कष्ट घ्यावे लागले आहेत.
मालिकांपासून चित्रपटांपर्यंत, अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत विविध क्षेत्रात स्वत:ला सिद्ध करणारा अभिनेता म्हणजे सुबोध भावे. सुबोध भावेचा आज 45वा वाढदिवस. 9 नोव्हेंबर 1975 साली पुण्यामध्ये त्याचा जन्म झाला.
सुबोध भावेने या गोजिरवाण्या घरात, वादळवाट, तुला पाहते रे, अवंतिका, कळत नकळत अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून काम केलं आहे.
चंद्र आहे साक्षीला या नव्या मालिकेतून सुबोध आपल्या भेटीला येणार आहे. 11 नोव्हेंबरपासून कलर्स मराठीवर ही मालिका सुरू होत आहे.
चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर सुबोध भावेने साकारलेले बायोपिक विशेष गाजले. लोकमान्य – एक युग पुरुष, बालगंधर्व या सिनेमांमध्ये त्याच्या कामाचं खूप कौतुक झालं. बालगंधर्वांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणं अतिशय आव्हानात्मक होतं. पण सुबोधने आपल्या अभिनयाच्या जोरावर हे आव्हान सहज पेललं.
...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या चित्रपटामध्ये त्याने काशीनाथ घाणेकर यांची भूमिका अतिशय समर्थपणे साकारली.
2015 साली प्रदर्शित झालेल्या 'कट्यार काळजात घुसली' चित्रपटाचं दिग्दर्शनही त्याने केलं होतं. या सिनेमातली गाणी, कलाकारांचा अभिनय यांचं आजही कौतुक केलं जातं.
सुबोधच्या रिअलची लाइफमधील लव्हस्टोरीही अतिशय इंटरेस्टिंग आहे. त्याने मंजिरी ओक या बालपणीच्या मैत्रिणी लग्न केलं. त्यांना मल्हार आणि कान्हा ही दोन मुलं आहेत.
सुबोधला मिळालेलं यश सहज मिळालेलं नाही. त्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितलं होतं की, ‘कॉलेजमध्ये बारावीला असताना मी नापास झालो होतो. तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. पण जिद्दं हरलो नाही. तेव्हा आलेल्या अपयशामुळे आता अपयशाची भीती वाटत नाही. तेव्हा पास झालो असतो तर कदाचित इतरांप्रमाणे बीएस्सी, बीई केलं असतं. पण त्यानंतर शिक्षण पूर्ण केलं आणि अभिनय क्षेत्रात आलो. आयुष्यभर वेगवेगळे प्रयोग करत राहिलो त्यामुळे हे यश मिळालं आहे.’