वरुणराजाचं आगमन झालं की तमाम स्त्रियांना आतुरता असते ती वटपौर्णिमा सणाची. वडाची पूजा करुन पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणं हा या सणाचा महत्त्वाचा उद्देश. स्टार प्रवाहवरील ( Star Pravah vatpurnima Special Episode) मालिकांमध्ये वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळणार आहे, पल्लवी, संजना आणि अनघा, अप्पू, रमा, पिंकी आणि अबोली यंदा पहिली वटपौर्णिमा साजरी करणार आहेत. पाहा मालिकेतील त्यांचे काही खास फोटो.
सगळ्यांची लाडकी अप्पूही पहिल्यांदा शशांकसाठी वटपौर्णिमेचा उपवास करणार आहे. संपूर्ण कानिटकर कुटुंबिय मिळून वटपौर्णिमेची धम्माल करताना दिसणार आहेत.
ऐन वाटपौर्णिमेच्या दिवशी कार्तिकच्या अटकेसाठी पोलीस हजर झालेत. कार्तिकवरचं हे संकट दूर व्हावं यासाठी दीपा वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे.
पिंकीचा विजय असो मालिकेत पिंकीसमोर युवराजबरोबर झालेल्या लग्नाचं खरं सत्य समर आलं आहे. परंतू हार मानेल ती पिंकी कसली युवराजसकट त्याच्या गाडीलाच पिंकी फेरे मारुन व्रत पूर्ण करणार आहे. पिंकी हटके अंदाजात वटपौर्णिमा साजरी करणार आहे.
आई कुठे काय करते मालिकेत अनघा आणि अभिचीही पहिलीच वटपौर्णिमा असणार आहे. दोघेही आई बाबा होणार असल्यानं दोघांसाठी ही पहिली वटपौर्णिमा फारचं खास असणार आहे.
तर आई कुठे काय करते मालिकेत अनिरुद्ध आणि संजना यांचीही पहिली वटपौर्णिमा असणार आहे. संजना आणि अनिरुद्धमध्ये आधीच खटके उडाल्यानं आता संजना हे व्रत कसं पूर्ण करणार हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप-गौरीमधील सगळे गैरसमज दूर झालेत. दोघेही आता प्रचंड खुश आहेत. गौरीही जयदीपासाठी वटपौर्णिमेचं व्रत करणार आहे.
फुलाला सुगंध मातीचा मालिकेतही कर्तव्य आणि घरच्या जबाबदाऱ्या अशी कसोटी पार करत कीर्ती आपलं स्वप्न पूर्ण करत आहे. तिच्या या प्रवासात तिला शुभमनं मोलाची साथ दिली आहे. त्यामुळे कीर्ती-शुभमसाठी यंदाची वटपौर्णिमा खास आहे.