JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2022 : अरूंधती ते पल्लवी; कलाकारांचा हटके अंदाज पाहून चाहते घायाळ!

स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2022 : अरूंधती ते पल्लवी; कलाकारांचा हटके अंदाज पाहून चाहते घायाळ!

मराठमोळ्या पोशाखाला ट्विस्ट आणलेल्या कपड्यांमध्ये कलाकार उठून दिसत होते. पाहा कोणी कसा केला पेहराव…

019

मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या ‘स्टार प्रवाह’ वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकत नंबर वन हे बिरुद कायम ठेवलं आहे. दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना मनोरंजनाची पर्वणी देणाऱ्या या वाहिनीवर लवकरच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
029

स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे दुसरं वर्ष आहे. मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहामध्ये नुकताच हा रंगारंग सोहळा पार पडला. स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती. रेड कार्पेटवरचा कलाकारांचा हटके अंदाज लक्ष वेधणारा होता.

जाहिरात
039

एरव्ही स्टार प्रवाहच्या लोकप्रिय मालिकांमधील या लोकप्रिय कलाकारांना त्यांच्या व्यक्तिरेखेमध्ये आपण भेटत असतो. पण स्टार प्रवाह परिवार पुरस्काराच्या निमित्ताने या सर्व कलाकारांचा अनोखा अंदाज भाव खाऊन गेला.

जाहिरात
049

रविवार 3 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजता हा सोहळा स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
059

परिवार असतो जिवाभावाचा, प्रेमाचा आणि विश्वासाच्या घट्ट नात्यांचा. जेव्हा सारे एकत्र येतात तेव्हा सोहळा होतो आनंदाचा, आपुलकीचा आणि कौतुकाचा.

जाहिरात
069

स्टार प्रवाहच्या कुटुंबाचा हा कौतुक सोहळा म्हणजे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी असणार आहे.

जाहिरात
079

खुमासदार सूत्रसंचालन, धमाकेदार परफॉर्मन्सेस आणि विनोदी आतषबाजीने परिपूर्ण असा हा सोहळा रविवार ३ एप्रिलला संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहता येणार आहे.

जाहिरात
089

यावेळी सर्व कलाकारांना हटक्या अंदाजात पाहायला मिळालं.

जाहिरात
099

3 एप्रिल रोजी चाहत्यांना कलाकारांचा हटके मराठमोळा अंदाज पाहायला मिळणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या