09 जून : बॉलिवूडचा बादशाह किंग खानचा नवा सिनेमा 4 आॅगस्टला रिलीज होतोय. या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज झाला. या सिनेमात नायिकेच्या भूमिकेत आहे अनुष्का शर्मा तर दिग्दर्शक आहे इम्तियाज अली खान. आणि नाव आहे जब हॅरी मेट सेजल. अहो नावाचीच तर खरी गोम आहे.या चित्रपटाचे नाव काय ठेवावं यावर बरीच चर्चा रंगलेली.इम्तियाज समोर तो खूप मोठा पेच होता.आधी नाव ठरलं ‘द रिंग’ .पण नंतर तेही बदललं.मग ‘रेहनुमा’ आणि ‘रौला’ या दोन नावांमध्ये बरीच टक्कर झाली .पण शेवटी जे नाव ठरलं ते या साऱ्यांहून एकदम हटके ! युरोपचं बॅकग्राऊंड असलेलं पोस्टर पाहिलं की रणबीर कपूरच्या ‘तमाशा’ची आठवण येते. फिल्मच्या पोस्टरवरची टॅगलाईन म्हणते, ‘ज्याला तुम्ही शोधताय ते तुम्हाला शोधतंय.’ आता जी प्रेक्षकांची गर्दी हा चित्रपट शोधतोय, ती गर्दी ही त्यांना शोधेल का हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल.