JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘या’ अभिनेत्याने पाच राज्यांत नऊ ट्रक भरून वाटले आयस्क्रीम, कारण...

‘या’ अभिनेत्याने पाच राज्यांत नऊ ट्रक भरून वाटले आयस्क्रीम, कारण...

जेव्हा तो 25 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बँक अकाउंटमध्ये 500 रुपयांपेक्षाही कमी रक्कम होती. यामुळे आँध्रा बँकेने त्यांचं अकाउंट लॉक केलं होतं

0106

सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा हा फक्त तेलगू सिनेसृष्टीचाच मेगास्टार नाहीये तर देशभरातील नावाजलेल्या कलाकारांमध्ये त्याचं नाव आवर्जुन घेतलं जातं.

जाहिरात
0206

काल 9 मे रोजी विजयने त्याचा 30 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याने चाहत्यांना एक खास भेट दिली.

जाहिरात
0306

या उन्हाच्या दिवसांमध्ये विजयने आपल्या चाहत्यांसाठी नऊ ट्रक भरून आयस्क्रिम वाटले. हे आयस्क्रिम एक, दोन नव्हे तर तब्बल हैदराबाद, विजयवाडा, तिरुपती, बंगळुरू, चैन्नई आणि कोची या पाच राज्यांमध्ये वाटण्यात आले.

जाहिरात
0406

विजयने हैदराबाद येथील बंजारा हिल्सच्या इथे स्वतः आयस्क्रिम वाटले. विशेष म्हणजे त्याने गेल्यावर्षीही सुमारे ४ ते ५ हजार आयस्क्रिम वाटले होते.

जाहिरात
0506

यावर्षी फोर्ब्सने जारी केलेल्या ३० वर्षांहून कमी श्रीमंत कलाकारांमध्ये विजय देवरकोंडाचं नाव आहे. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेली चुपूलु’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

जाहिरात
0606

विजयने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, जेव्हा तो 25 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या बँक अकाउंटमध्ये 500 रुपयांपेक्षाही कमी रक्कम होती. यामुळे आँध्रा बँकेने त्यांचं अकाउंट लॉक केलं होतं आणि आता फोर्ब्स इंडियाच्या 30 वर्षांहून श्रीमंत कलाकारांमध्ये माझं नाव आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या