JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री बनली रजनीकांत यांची शेजारी; खरेदी केलं कोट्यावधींचं घर

'ही' प्रसिद्ध अभिनेत्री बनली रजनीकांत यांची शेजारी; खरेदी केलं कोट्यावधींचं घर

मीडिया रिपोर्ट्सनुसार,अभिनेत्रीने नुकतेच तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या पोएस गार्डनमध्ये नवीन घर घेतले आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने सुपरस्टार रजनीकांत यांच्या बंगल्याजवळ तिचे नवीन घर घेतले आहे आणि ‘रांझना’ फेम धनुषही जवळच राहतो.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 नोव्हेंबर-   नयनतारा   (Nayanthara)   ही साऊथ  (South Actress)  फिल्म इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती अभिनयापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री तिच्या नवीन घराबाबत चर्चेत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नयनताराने नुकतेच तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या पोएस गार्डनमध्ये नवीन घर घेतले आहे. विशेष म्हणजे कर्नाटकातील या अभिनेत्रीने सुपरस्टार रजनीकांत   (Rajinikanth)  यांच्या बंगल्याजवळ तिचे नवीन घर घेतले आहे आणि ‘रांझना’ फेम धनुषही   (Dhanush)  जवळच राहतो. एखादा शुभ मुहूर्त पाहून अभिनेत्री लवकरच तिच्या नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नयनतारा तिचा बॉयफ्रेंड विघ्नेश शिवनसोबत लवकरच लग्न करणार आहे. आणि दोघांनीही प्लॅनिंग सुरू केले आहे. हे कपल सोशल मीडियावर एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करत असते. आता लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचेही दोघांच्या पोस्टवरून स्पष्ट होत आहे. मात्र, याबाबत दोन्ही बाजूंकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य माहिती मिळालेली नाही.

संबंधित बातम्या

जर नयनताराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर रजनीकांत स्टारर ‘अन्नत्थे’ या चित्रपटाद्वारे तिला आजकाल खूप प्रशंसा मिळत आहे. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. सध्या अभिनेत्री चिरंजीवी स्टारर ‘गॉडफादर’ या चित्रपटात व्यस्त आहे. आणि तिने ‘कथू वाकुला रेंदू कादल’चे शूटिंग पूर्ण केले आहे. काथू वाकुला रेंदू कादल हा चित्रपट नयनताराचा प्रियकर विघ्नेश शिवन दिग्दर्शित करत असून यामध्ये ती विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. विघ्नेश पूर्वी नयनतारा प्रभुदेवामुळे चर्चेत होती. असं म्हटलं जातं की, प्रभुदेवाचं दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारावर (Nayanthara) प्रेम होतं. लग्न झाल्यानंतरही ते तिच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात होते. नयनताराचं देखील प्रभुदेवावर खूप प्रेम होते. या प्रेमापोटी तिनं ख्रिश्चन धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला होता. प्रभुदेवाचं रामलताशी लग्न झालं होतं. नयनताराशी असलेले संबंध उघडकीस आल्यानंतर संतापलेल्या रामलतानं कौटुंबिक न्यायालयात याचिका दाखल केली. शिवाय नयनतारापासून दूर राहण्यासाठी प्रभुदेवावर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. आता अभिनेत्री विघ्नेशसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या