मुंबई, 25 मे : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. मागच्या काही दिवसांपासून तो मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या मजूरांना तो त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत करताना दिसत आहे. सोनू सूद मागच्या काही दिवसांपासून त्याच्या ट्वीटरवर खूप सक्रिय आहे. यावरुन मिळालेल्या मेसेजच्या माध्यमातून तो अनेकानं मदत करताना दिसत आहे आणि त्याच्या या कामासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांनी त्याचं कौतुक सुद्धा केलं होतं. सध्या ट्विटरवर सोनू सूदला उद्देशून अनेक ट्वीट केले जात आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील लोकांना आता मुंबईमध्ये राहून जीवन व्यतीत करणं खूप कठीण होत आहे. त्यामुळे सध्या ते मुंबईतून बाहेर पडून आपापल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि यासाठी सोनू सूदनं आतापर्यंत अनेकांना मदत केली आहे. अशात एका युजरनं मात्र ट्विटीरवर त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा हा प्रयत्न सपशेल फसलेला दिसून आला. अभिनेत्यानं या युजरला सडेतोड उत्तर देत त्याची बोलती बंद केली.
मागच्या काही दिवसांपासून अनेक लोक सोनू सूदच्या ट्विटरवर अनेकजण ट्वीट करताना दिसत आहेत. पण नुकतंच एका व्यक्तीनं असं काही ट्वीट केलं की ज्यामुळे तुम्हाला हसू आवरणार नाही. एका व्यक्तीनं सोनूकडे मजेदार मागणी करत त्याला ट्रोल करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. बुल्ला भाई नावाच्या एका अकाउंटवरून या व्यक्तीनं सोनूला टॅग करत ट्वीट केलं, सोनू भाई मी माझ्या घरात अडकलो आहे. मला माझ्या ठेक्यापर्यंत पोहोवा. आतापर्यंत लोकांनी केलेल्या मागण्यामध्ये ही सर्वात अत्रंगी मागणी होती. मात्र सोनूनं सुद्धा या युजरला सडेतोड उत्तर दिलं. त्यानं रिप्लाय दिला, ‘मी तुला ठेक्यापासून घरापर्यंत पोहोचवू शकतो गरज पडली तर सांग’
काही दिवासांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दारूची दुकानं सुरू करण्याच्या मागणीनं जोर धरला होता. ज्यानंतर सरकारनं दारुची दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण सोनू सूदकडे दारूच्या दुकानाकडे पोहोचवण्याची मागणी करणाऱ्या या व्यक्तीची चतुराई सोनूनं लगेच ओळखली आणि त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिलं. बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये नेहमीच व्हिलनच्या भूमिकेत दिसणारा सोनू सूद सध्या सर्वांचा हिरो म्हणून उभा राहिला आहे.