JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / इटलीमध्ये रोमँटिक झाली सोनम कपूर, शेअर केला पतीसोबतचा लिपलॉक KISS VIDEO

इटलीमध्ये रोमँटिक झाली सोनम कपूर, शेअर केला पतीसोबतचा लिपलॉक KISS VIDEO

सोनमनं शेअर केलेल्या व्हिडीओत ती आणि आनंद एकमेकांना लिप लॉक किस करताना दिसत आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 01 जानेवारी : आज संपूर्ण जगभरात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आलं. पण त्याआधी सरत्या वर्षाला निरेपही दिला गेला. बॉलिवूडचे सेलिब्रेटी सध्या व्हेकेशन मोडवर आहेत. त्यामुळे तिथूनच त्यांनी 2019 ला अलविदा केला. पण यातही अभिनेत्री सोनम कपूरचा अंदाज मात्र थोडा हटके होता. सोनम सध्या पती आनंद आहुजासोबत रोम, इटलीमध्ये आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक रोमँटिक व्हिडीओ शेअर केला. ज्यात ती बर्फाळ डोंगरांवर आनंदसोबत रोमान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर सोनमचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सोनमनं लिहिलं, मागचं संपूर्ण दशक माझ्यासाठी खूपच चांगलं राहिलंया दरम्यान मी अनेक चांगले सिनेमा केले. मला अनेक चांगले लोक भेटले. जे आता माझे आयुष्यभरासाठीचे मित्र झाले आहेत. मी माझी बहीण रिया कपूरसोबत 3 सिनेमात काम केलं. या दरम्यान मला एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बहीण खूप चांगली पार्टनर असते. आम्ही आमच्या फॅशनच्या पॅशनला पुढे नेण्यासाठी Wearerheson हा क्लोदिंग ब्रॅन्ड सुरू केला. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडेंची धर्मेंद्र यांच्याविरोधात कोर्टात धाव सोनमनं या पोस्टमध्ये पती आनंद आहुजाबद्दलही लिहिलं, ‘या दशकाच्या प्रवासात मला आनंद भेटला. आम्ही लग्न सुद्धा केलं आणि आता सुखाचा संसार करत आहोत. पण या सगळ्या व्यतिरिक्त मला या संपूर्ण दशकात एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे जीवनात अनेक रस्ते असतात. पण आपल्याला त्या एकाच रस्त्यावर चालायचं आहे जो आपल्याला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणार आहे.’ या पोस्टमध्ये सोनमनं कुटुंब, मित्र, सिनेमा आणि फॅशन या सर्वांनाच धन्यवाद दिले. धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीने डोक्यात हातोडी घालून Ex Boyfriend ला संपवलं

सोनमनं शेअर केलेल्या व्हिडीओत ती आणि आनंद एकमेकांना लिप लॉक किस करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. सोनमच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती शेवटची ‘एक लडकी को देखा…’ या सिनेमात दिसली होती. समलैंगिक संबंधांवर आधारित असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर मात्र फारशी कमाल करु शकला नव्हता. …जेव्हा गायिका सुनिधी चौहानचा मुलगा तिला गाण्यात साथ देतो, पाहा VIRAL VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या