JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अनिल कपूरची मुलगी नसतीस तर...' सुशांतबद्दल सोनमच्या 'त्या' ट्वीटवर का भडकले नेटकरी

'अनिल कपूरची मुलगी नसतीस तर...' सुशांतबद्दल सोनमच्या 'त्या' ट्वीटवर का भडकले नेटकरी

सोनम कपूरनं सुशांतबद्दल असं काही ट्वीट केलं आहे की, आता ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे आणि तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 16 जून : फक्त बॉलिवूडच नाही तर इतर सर्वांना देखील 2020 हे वर्ष विसरणं खूप कठीण आहे. या वर्षांत म्हणण्यापेक्षा मागच्या काही महिन्यात बॉलिवूड अनेक चांगले कलाकार गमवले. पण सर्वाधिक धक्कादायक होती ती सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या. सुशांतनं त्याच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली. पण त्यानंतर कंगना रणौतच्या व्हिडीओने नेपोटिझमचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला. अशात सोनम कपूरनं सुशांतबद्दल असं काही ट्वीट केलं आता ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय राहणारी बॉलिवूड अभिनत्री सोनम कपूर सध्या तिनं सुशांतबद्दल केलेल्या ट्वीटमुळे चर्चेत आली आहे. सोनमनं लिहिलं, ‘एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड, एक्स गर्लफ्रेंड, कुटुंबीय आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना दोष देणं चुकीचं आहे.’ सोनमच्या या ट्वीटवर सध्या नेटकरी भडकले असून त्यांनी तिला चांगलंच खडसावलं आहे. आधीच सुरू असलेल्या नेपोटिझमच्या वादात आता सोनम सुद्धा या ट्वीटमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

संबंधित बातम्या

अनेकांनी सोनमच्या या ट्वीटवरून तिच्यावर टीका करत हा गर्लफ्रेंड किंवा एक्स गर्लफ्रेंडचा मुद्दा नाही त्यांना कोणीही दोष देत नाही आहे तर बॉलिवूडमधल्या नेपोटिझमला दोष दिला जात आहे असं म्हटलं आहे.

जाहिरात
जाहिरात

सोनमच्या या ट्वीटर एका युजरनं तिला म्हटलं जर तु अनिल कपूर यांची मुलगी नसतीस तर साफसफाईचं काम करत असतीस. असं म्हटलं आहे. त्यामुळे अशाप्रकारचं ट्वीट करणं सोनमला पुन्हा एकदा भारी पडलं आहे.

जाहिरात
जाहिरात

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये एकच खळबळ माजली आहे. त्यानं नैराश्यात आत्महत्या केली असं म्हटलं जात असलं तरी हा प्लान मर्डर होता असं म्हणणारेही काही लोक आहेत. सुशांतला बॉलिवूडमध्ये नेपोटिझमचा समाना करावा लागला होता. त्याला कधीच कोणत्याही प्रकारचा पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळेच त्यानं नैराश्यात हे पाऊल उचललं असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या