JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sonam Kapoor: सोनम कपूरच्या घरी आला छोटा राजकुमार, मसक्कली गर्ल बनली आई

Sonam Kapoor: सोनम कपूरच्या घरी आला छोटा राजकुमार, मसक्कली गर्ल बनली आई

मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने पहिल्या मुलाला जन्म दिला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 20 ऑगस्ट: मनोरंजन विश्वातून एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीची चर्चा रंगली होती. अखेर सोनमला शनिवारी पुत्रप्राप्ती झाली आहे. अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. नीतू कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद अहुजा यांच्या वतीने त्यांनी पोस्ट शेअर केली होती. शेअर केलेल्या पोस्टनुसार,अभिनेत्रीने शनिवारी, 20 ऑगस्ट रोजी एका मुलाला जन्म दिला. सोशल मीडियावर ही बातमी तुफान व्हायरल होत असून सगळीकडून सोनम आणि तिच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पहायला मिळतोय.

या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘20 ऑगस्ट 2022 रोजी आम्ही आमच्या मुलाचे स्वागत केले आहे. या सुंदर प्रवासात आम्हाला साथ दिल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे, परंतु आपल्याला माहित आहे की आता आपले जीवन कायमचे पूर्णपणे बदलणार आहे. सोनम आणि आनंद.’ सध्या ही बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. या गुड न्युजमुळे तिचे चाहते तर खूप जास्त आनंदी झाले आहेत. दरम्यान, सोनमला मुलगा होणार की मुलगी? याबाबत तिच्या चाहत्यांमध्ये अनेक तर्क वितर्क लावले जात होते. अखेर सोनमला मुलगा झाला असून सगळीकडे आनंद पसरला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या