JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sonali Phogat Death: सोनाली फोगाट आणि PA सुधीर सांगवान होते पती-पत्नी? फ्लॅट नं 901 चं गूढ वाढलं

Sonali Phogat Death: सोनाली फोगाट आणि PA सुधीर सांगवान होते पती-पत्नी? फ्लॅट नं 901 चं गूढ वाढलं

भाजप नेत्या, टिकटॉक स्टार, अभिनेत्री सोनाली फोगाट यांचं मृत्यू प्रकरण दिवसेंदिवस गंभीर बनत चाललं आहे. सुरुवातीला हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं समोर आलं होतं. परंतु त्यांच्या कुटुंबाने अनेक गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 ऑगस्ट-   भाजप नेत्या, टिकटॉक स्टार, अभिनेत्री सोनाली फोगाट यांचं मृत्यू प्रकरण दिवसेंदिवस गंभीर बनत चाललं आहे. सुरुवातीला हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं समोर आलं होतं. परंतु त्यांच्या कुटुंबाने अनेक गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. गोवा पोलिसांनी सोनाली दोघांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आता सोनाली यांच्याबाबत आणखी एक चकित करणारी गोष्ट समोर आली आहे. सोनाली यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांना गोवा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी सोनाली यांना जबरदस्ती ड्रग्स पाजल्याचं समोर आलं आहे. आज त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, सोनाली फोगाट यांनी गुरुग्राम या ठिकाणी एक फ्लॅट खरेदी केला होता. त्यांनी पीए सुधीर सांगवान यांच्यासोबत हा फ्लॅट खरेदी केला होता. 901 असा हा फ्लॅट क्रमांक आहे. या रिपोर्टनुसार, त्या फ्लॅटमध्ये राहात असताना सुधीर सांगवानने शेजाऱ्यांना सोनाली फोगाट आपली पत्नी असल्याचं सांगितलं होतं. या गोष्टीमुळे एकच खळबळ माजली आहे. इतकंच नव्हे तर एका पोलीस अधिकाऱ्याकडून याबाबतची पडताळणीदेखील करण्यात आली होती. महत्वाचं म्हणजे सोनाली फोगाट आणि सुधीर सांगवान हे दोघे गोव्याला जाण्यापूर्वी गुरुग्रामच्या या फ्लॅटमध्ये एकत्र दिसून आले होते. त्यांनी या सोसायटीमध्ये कार पार्क केली होती. त्यानंतर तिथून टॅक्सी करुन एयरपोर्टसाठी गेले होते. सध्या पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिलेली नाहीय. परंतु याचा तपास सुरु आहे. (हे वाचा: Sonali Phogat: सोनाली मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट; गॊवा पोलिसांनी दोघांना केली अटक **)** सोनालीच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा- सोनालीच्या भावानं गोवा पोलिसात धाव घेत धक्कादायक दावे केले होते. त्यांनी सांगितलं, ‘सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा मित्र सुखविंदर यांनी मिळून माझ्या बहिणीला जाळ्यात अडकवलं. सुखविंदरने तीन वर्षांपूर्वी सोनालीच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळून तिच्यावर बलात्कार केला होता आणि त्याचा व्हिडिओही बनवला होता. त्यानंतर सुधीर आणि त्याचा मित्र सुखविंदर सातत्यानं सोनालीला ब्लॅकमेल करत होते. हे दोघं अधूनमधून सोनालीच्या जेवणात विषारी पदार्थ मिसळत होते. त्यामुळे अनेकदा तिची प्रकृती बिघडली होती. शेवटी या दोघांनी मिळून कट करत गोव्यात नेऊन तिची हत्या केली’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या