मुंबई, 27 ऑगस्ट- सोशल मीडियास्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या संशयित तस्कराला गोवा पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. गोवा पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणातील दोन्ही आरोपींनी त्यांच्या जबाबात या संशयिताकडून ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिल्यानंतर दत्तप्रसाद गावकर याला अंजुना येथून ताब्यात घेण्यात आलं असल्याचं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ताब्यात घेतलेल्या आणखी एका व्यक्तीचं नाव एडविन नुनेस असं आहे. जेथे सोनाली फोगाट 22 ऑगस्ट रोजी मृत्यूपूर्वी उशिरा पार्टी करत होती त्या कर्लीज रेस्टॉरंटचा तो मालक आहे. याआधी गोवा पोलिसांनी भाजप नेत्या आणि ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सोनाली फोगटसोबत गोव्यात आलेला त्यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंहला अटक केली होती. सोनाली फोगट हिला 23 ऑगस्ट रोजी सकाळी उत्तर गोवा जिल्ह्यातील अंजुना येथील सेंट अँथनी हॉस्पिटलमधील हॉटेलमधून मृत आणण्यात आलं होतं. सोनाली प्रकरणात मोठी माहिती देत पोलिसांनी शुक्रवारी सांगितलं होतं की, सुधीर संगवान आणि सुखविंदर सिंह यांनी 22 आणि 23 ऑगस्टच्या मध्यरात्री कर्लीज रेस्टॉरंटमध्ये एका पार्टीदरम्यान पाण्यात अंमली पदार्थ मिसळले आणि सोनाली फोगटला ते प्यायला भाग पाडलं. या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केल्याचंसुद्धा पोलिसांनी सांगितलं आहे. सोनाली फोगटच्या कथित हत्येला आर्थिकबाबी कारणीभूत असू शकतात, असा अंदाज एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने व्यक्त केला होता.
(हे वाचा: Sonali Phogat Death: सोनाली फोगाट आणि PA सुधीर सांगवान होते पती-पत्नी? फ्लॅट नं 901 चं गूढ वाढलं ) सोनाली फोगटच्या भावाने पोलिसांत केली होती तक्रार- सोनाली फोगट यांच्या भावाने गोवा पोलिसांत सोनालीचा खुन झाल्याचा दावा करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींची चौकशी करत त्यांचा कबुली जबाब नोंदवून घेतला होता. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपलब्ध साक्षीदारांच्या मदतीनं, सीसीटीव्ही फुटेज पाहिले गेले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सोनाली फोगट यांच्यावर दोन्ही संशयित आरोपी पार्टी करताना दिसून आले होते. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, दोघे सोनालीला जबरदस्ती काही तरी पाजण्याचा प्रयत्न करत आहेत. सोनाली यांच्या ड्रिंक्समध्ये ड्रग मिसळून त्यांना पाजण्यात आलं असल्याचंही गोवा पोलिसांनी सांगितलं आहे.