JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सोनालीपूर्वी तिच्या पतीचादेखील झालाय रहस्यमय मृत्यू, एकटी झाली 15 वर्षाची लेक

सोनालीपूर्वी तिच्या पतीचादेखील झालाय रहस्यमय मृत्यू, एकटी झाली 15 वर्षाची लेक

भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. परंतु, त्यांची हत्या झाल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त केला जातोय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑगस्ट-  भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे गोव्यामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. परंतु, त्यांची हत्या झाल्याचा संशय कुटुंबीयांकडून व्यक्त केला जातोय. दुसरीकडे, सोनाली आणि त्यांचे पती संजय या दोघांच्या अकाली मृत्यूने त्यांची 15 वर्षीय मुलगी यशोधरावरील आई-वडिलांचं छत्र हिरावलं गेलयं. यशोधरा आणि सोनाली यांच्यातील नातं फार घट्ट होतं.पित्याच्या निधनानंतर सोनाली यांनी यशोधराची पूर्ण काळजी व जबाबदारी घेतली होती. ऑगस्ट महिन्यात सात तारखेला यशोधराचा वाढदिवस होता. या वेळी सोनाली मुलीला भेटण्यासाठीही आल्या होत्या. फार्म हाउसवर आढळला होता पतीचा मृतदेह संजय आणि सोनाली हे आधीपासून नातेवाईक होते. बहिणीच्या दिरासोबत सोनाली यांचा विवाह झाला होता. 2016 मध्ये हरियाणामधील एका फार्म हाउसवर सोनाली फोगाट यांचे पती संजय यांचा मृतदेह आढळला होता. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचं गूढ आजपर्यंत उलगडलेलं नाही. संजय यांचा मृत्यू झाला तेव्हा सोनाली या मुंबईमध्ये होत्या. बिग बॉसमधील ‘लेट नाईट मसाला’ या विशेष एपिसोडमध्ये सोनाली यांनी त्यांच्या खासगी आयुष्यासंदर्भातील अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. कुटुंबातील बहुतांश पुरुषांचा मृत्यू झाला असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं होतं. माझे पती अशाप्रकारे जग सोडून जातील, असं कधीही वाटलं नव्हतं. पतीच्या मृत्यूनंतर राजकारण, अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, सासूबाईंनी प्रोत्साहन आणि पाठिंबा दिल्यामुळे अभिनय आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये छाप पाडू शकल्याचं त्यांनी म्हटलं होतं. स्वीय सहायक सुधीर सांगवान यांना शोक अनावर गोवा येथे सोनाली फोगाट यांचं निधन झालं. या वेळी त्यांचे स्वीय सहायक (Personal Assistant) सुधीर सांगवान हे त्यांच्यासोबत होते. सोनाली यांच्या मृत्यूनंतर सुधीर यांनाही शोक अनावर झाला. दुसरीकडं, भाजप जिल्हाध्यक्ष कॅप्टन भूपेंद्र सिंह यांनीही सोनाली यांच्या मृत्यूनंतर शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. दु:खद प्रसंगांत आपण फोगाट कुटुंबीयांसोबत असल्याचं त्यांनी म्हटलंय. **(हे वाचा:** Sonali Phogat: सोनालीच्या मृत्यूनंतर अशी झालीये लेकीची अवस्था; रडून-रडून आईसाठी मागतेय न्याय ) विधानसभा लढवल्यानंतर आल्या चर्चेत सोनाली फोगाट यांनी राजकारणात त्यांचा नावलौकीक निर्माण केला होता. आदमपूर इथून माजी मुख्यमंत्री चौधरी भजन लाल यांचे सुपुत्र कुलदीप बिष्णोई यांच्या विरोधात त्यांनी विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर त्या चर्चेत आल्या. या निवडणुकीत सोनाली यांचा पराभव झाला. पण प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्यांनी बऱ्यापैकी मतं घेतली होती. निवडणूक हरल्यानंतरही त्यांनी जनतेत जाणं सोडलं नाही. मुख्यमंत्र्यांमार्फत त्यांनी अनेक विकासकामं मार्गी लावली. सोनाली यांना 2021 मध्ये बिग बॉस टीव्ही कार्यक्रमामध्येही प्रवेश मिळाला होता. दरम्यान, सोनाली यांच्यावर प्रेम करणारी जनता खूप आहे. 2018 पासून आदमपुर विधानसभा मतदारसंघात विकास करण्यासाठी त्या आग्रही होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर संतनगर भागातील त्यांच्या फार्म हाउसवर कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी लोकांची गर्दी आजही कायम आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या