JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / 'या' सहकलाकारासोबत sonalee Kulkarni चा झालाय वाद; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

'या' सहकलाकारासोबत sonalee Kulkarni चा झालाय वाद; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा

मराठमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते. अशातच सोनालीने झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बस बाई बस’ मध्ये हजेरी लावली.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 सप्टेंबर : मराठमोळी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायम चर्चेत असते. अशातच सोनालीने झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘बस बाई बस’ मध्ये हजेरी लावली. याचा व्हिडीओ समोर आला असून या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. या कार्यक्रमात सोनालीने अनेक खुलासे केले आहेत. सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ‘बस बाई बस’ कार्यक्रमात सोनाली कुलकर्णीने पाहुणी म्हणून हजेरी लावली. यावेळी सुबोध भावेंनी नेहमीप्रमाणे प्रश्नांचा भडिमार केला. सुबोध भावेंनी सोनालीला विचारलं की सहकलाकारासोबत कधी भांडण झालं आहे का?, यावर सोनाली म्हणते हो. सिद्धार्थ जाधवसोबत. आम्ही सतत भांडत असतो. पुढे सुबोध भावे विचारतात की, सिग्नल तोडलाय का?, यावरही सोनालीचं उत्तर हो पहायला मिळालं. याशिवाय सोनाली ‘इशारा तुला दिसला ना’ या गाण्यावर तालही धरला. त्यामुळे सोनालीने हजेरी लावलेल्या भागात धमाल, मस्ती मजा तर पहायला मिळणार यात काही वाद नाही.

संबंधित बातम्या

झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारा कार्यक्रम ‘बस बाई बस’ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे सांभाळत आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला या कार्यक्रमात सहभागी होत असलेल्या पहायला मिळतात. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सुबोध भावे निरनिराळे प्रश्न विचारतात. हेही वाचा-  टीव्हीवर रंगला मराठी कलाकारांचा पुरस्कार सोहळा; रेड कार्पेटवर सेलिब्रेटींचा ग्लॅमरस अंदाज दरम्यान, आपल्या सौदर्यांनं आणि अभिनयानं घायाळ करणारी सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. शिवाय ती निरनिराळे फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या