JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / सोनाक्षीचा ऑनलाइन छळ करणारा अटकेत; अभिनेत्री म्हणाली, "सावध राहा आता तुमचा नंबर"

सोनाक्षीचा ऑनलाइन छळ करणारा अटकेत; अभिनेत्री म्हणाली, "सावध राहा आता तुमचा नंबर"

ऑनलाइन छळ करणाऱ्यांविरोधात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (sonakshi sinha) मोहीम छेडली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 21 ऑगस्ट : सध्या अनेक सेलिब्रिटींना ऑनलाइन ट्रोल केलं जातं आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हालादेखील (sonakshi sinha) या ट्रोलर्सचा सामना करावा लागला. याविरोधात तिने आवाज उठवला आपला ऑनलाइन छळ होत असल्याने तिने मुंबई पोलिसात तक्रार दिली आणि मुंबई पोलिासांच्या सायबर गुन्हे शाखेनं ऑनलाइन छळ करणाऱ्या अशा एका आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने 7 ऑगस्टला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऑनलाइन छळ करणाऱ्यांविरोधात मोहीम छेडली होती. मिशन जोशसह मिळून तिने ही मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडियावर अर्वाच्च भाषेत कमेंट देणाऱ्यांविरोधात तिने तक्रार केली होती. त्यापैकी एकाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शशिकांत जाधव असं या आरोपीचं नाव असून, त्याला औरंगाबादमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान यानंतर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. “इंटरनेटचं जग असं स्वच्छ करण्यासाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल आणि आमच्या तक्रारीनंतर तात्काळ कारवाईची पावलं उचल्याने मुंबई पोलीस आणि सायबर गुन्हे शाखेची मी आभारी आहे. यामुळे जो कुणी ऑनलाइन छळाला सामोरं जात आहे, त्याला त्याविरोधात लढण्यासाठी बळ नक्कीच मिळेल”, असं सोनाक्षीने म्हटलं आहे. हे वाचा -  “प्रेमात एक वर्षानंतर एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो”, रियाचा VIDEO VIRAL तसंच ऑनलाइन छळ करणाऱ्यांनाही तिनं सावध केलं आहे. “सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सावध राहा. कोणतीही कमेंट करताना विचारपूर्वक करा. नाहीतर पुढचा नंबर तुमचाच असेल असं तिनं म्हटलं आहे. ऑनलाइन छळ करणाऱ्यांबाबत मी आता गप्प बसणार नाही, मी हे सहन करणार नाही. तुम्हीदेखील गप्प बसू नका. ऑनलाइन छळ होत असेल तर आवाज उठवा” असं आवाहनही तिनं केलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या