Mika Singh
मुंबई, 29 सप्टेंबर : आपल्या भारदस्त आवाजानं आणि जबरदस्त गाण्यांनी लोकांना वेड लावणारा लोकप्रिय गायक म्हणजे मिका सिंह. मिकानं आपल्या गाण्यांनी बॉलिवूडवर एक वेगळी अशी छाप सोडली आहे. मिकाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर असून नुकताच तो मिका दी वोहती’मध्ये झळकला होता. या कार्यक्रमात त्यानं त्याच्या लाईफ पार्टनरची निवड केली. त्याची मैत्रिण आकांक्षा पुरी हिची लग्नासाठी निवड केल्यामुळे मिका चांगलाच चर्चेत आला होता. सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मिका सिंहने खाजगी बेट विकत घेतलं असल्याची बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये तो खास वेळ घालवत आहे. मिका सिंहचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो बोट चालवताना दिसत आहे. त्यांचे अंगरक्षक किनाऱ्यावर उभे आहेत. मिका सिंह हा पहिला भारतीय गायक आहे ज्याने स्वतःचे खाजगी बेट विकत घेतले आहे. मिकाच्या व्हिडीओ अनेक कमेंट येत आहेत. ‘मिका पाजी, सिंग इज किंगचे आयुष्य जगणारे तुम्हीच आहात, सिंग अज किंग’, असे चाहते म्हणत आहेत.
मिकाने बेटासह सात बोटी आणि 10 घोडेही खरेदी केले आहेत. मिका सिंगला आलिशान वाहने आणि बंगल्यांचाही शौक आहे. मिका त्याच्या एका गाण्यासाठी सुमारे 15 लाख रुपये घेतो. चित्रपटांतील गाण्यांसोबतच मिकाचे अल्बमही हिट आहेत. मिका सिंहची एकूण संपत्ती सुमारे 13 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 96 कोटी रुपये इतकी आहे. मिका विविध सामाजिक उपक्रम करतानासुद्धा दिसून येतो.
दरम्यान, मिका सिंह हा एक प्रसिद्ध गायक, रॅपर आहे बॉलिवूडला एकापेक्षा एक सर्वोत्तम गाणी दिली आहेत. ‘मौजा ही मौजा’, ‘धन्नो’ सारखी ब्लॉकबस्टर गाणी आजही प्रत्येकाच्या तोंडात असतात. सध्या त्याच्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधलं असून त्यानं खरेदी केलेल्या बेटाविषयी अनेक प्रतिक्रिया येत आहेत.