सुप्रसिद्ध गायक केके यांचं निधन होऊन जवळपास दीड महिना उलटला आहे. केकेची पत्नी ज्योती कृष्णाने आता सोशल मीडियावर आपली एक सुंदर पेंटिंग शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
सुप्रसिद्ध गायक केके यांचं निधन होऊन जवळपास दीड महिना उलटला आहे. केकेची पत्नी ज्योती कृष्णाने आता सोशल मीडियावर आपली एक सुंदर पेंटिंग शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
साहजिकच ती पती केकेला खूप मिस करत आहे. ज्योतीची सुंदर पेंटिंग पाहून सिंगरचे चाहते भावुक होत आहेत.
31 मे रोजी गायक के.के. यांचं कोलकत्ता येथील एका लाईव्ह शो दरम्यान निधन झालं होतं. त्यामुळे त्याच्या कुटुंबासह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. आजही त्याच्या कुटुंबासोबतच त्याचे चाहतेही त्याला प्रचंड मिस करतात.
केकेची पत्नी ज्योती कृष्णाने गुरुवारी एका पेंटिंगची पोस्ट शेअर केली आहे. ही पेंटिंग तिने स्वतःबनवली आहे. दिवंगत गायक केके पत्नी ज्योतीसोबत या पेंटिंगमध्ये दिसत आहे. पेंटिंग शेअर करत ज्योतीने लिहिलंय, ''पुन्हा पेंटिंग बनवण्याचा प्रयत्न करत आहे. तुझी खूप आठवण येते स्वीटहार्ट.'
केके यांच्या पत्नी ज्योती कृष्णा या व्यवसायाने चित्रकार आहेत. केकेच्या निधनानंतर त्यांनी पहिल्यांदाच पेंटिंग बनवली आहे.
ज्योती कृष्णा यांना आपल्या भावना आवरणं कठीण झालं आहे. पतीच्या निधनाच्या दीड महिन्यांनंतर त्यांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.