JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / कुटुंबाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही सिद्धार्थ शुक्लाचं नाव, शेहनाज गिलने शेअर केली पोस्ट

कुटुंबाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही सिद्धार्थ शुक्लाचं नाव, शेहनाज गिलने शेअर केली पोस्ट

दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने नुकताच एक निवेदन जारी केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 जानेवारी-   प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस विजेता   (Bigg Boss Winner)  सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाला  (Sidharth Shukla Death)  तब्बल चार महिने होत आले आहेत.परंतु आजही चाहते त्याला विसरू शकलेले नाहीत. आजही सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करून अभिनेत्याची आठवण काढली जाते. दरम्यान आता शुक्ला कुटुंबाकडून एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी एक खास आवाहन केलं आहे. हे निवेदन शेहनाज गिलने   (Shehnaaz Gil)  आपल्या इन्स्टाग्रामवर (Instagram)  शेअर केलं आहे. काय आहे निवेदन- दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने नुकताच एक निवेदन जारी केलं आहे. या निवेदनात असं सांगण्यात आलं आहे. की, आगामी काळात कोणत्याही प्रोजेक्टमध्ये सिद्धार्थ शुक्लाच्या नावाचा वापर करण्यात येणार असेल, तर त्याआधी त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात यावा. तसेच निवेदनात पुढे म्हटलं आहे, ‘सिद्धार्थच्या सर्व शुभचिंतकांना त्याच्या या कुटुंबामार्फत आम्ही आवाहन करत आहे. आता सिद्धार्थ या जगात नाही. तो आता पुढे निघून गेला आहे. त्यामुळे तो याठिकाणी आता कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही. परंतु तो आजही आमच्यामध्ये जिवंत आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या इच्छा आणि सूत्रांचं पालन याठिकाणी करत आहोत’. सर्वांनीच त्याचा आदर करावा आणि सहकार्य करावं. यामध्ये सांगण्यात आलं आहे, इथून पुढे कोणत्याही प्रोजेक्टमध्ये सिद्धार्थच्या नावाचा किंवा त्याच्या चेहऱ्याचा वापर करण्यात येणार असेल, तर सर्वात आधी आमच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात यावा. कारण आम्ही त्याच्या इच्छा आणि आवडी निवडी चांगल्या प्रकारे ओळखतो. आम्हाला चांगलंच माहिती आहे त्याच्या उपस्थित तो कोणत्या गोष्टीला मान्यता दिला असता आणि कोणत्या नाही. त्यामुळे त्याचा आदर करूनच पुढचे सर्व निर्णय घेतले जातील. अपेक्षा आहे की सर्वांनीच या गोष्टीचं पालन करावं. शेहनाज गिलची पोस्ट- अभिनेत्री शेहनाज गिलने शुक्ला कुटुंबामार्फत जारी करण्यात आलेलं हे निवेदन आपल्या सोशल मीडियावर शेअर केलं आहे. शेहनाजने काही तासांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर हे निवेदन शेअर केलं आहे. शेहनाज सिद्धार्थच्या अत्यंत जवळ होती. या दोघांचं नातं त्यांचं प्रेम सर्वांनीच पाहिलं आहे. बिग बॉसच्या घरात शेहनाज आणि सिद्धार्थमध्ये एक खास नातं तयार झालं होतं. हे दोघेही घरात एकमेकांसाठी उभे राहताना दिसले होते. परंतु सिद्धार्थच्या अचानक जाण्याने शेहनाजला मोठा धक्का बसला होता. सध्या यामधून स्वतःला सावरत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या