मुंबई, 14 ऑक्टोबर- अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या**(Sidharth Shukla)** अकाली मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. याचा सर्वात जास्त परिणाम सिद्धार्थचे कुटुंबीय आणि त्याची गर्लफ्रेंड शेहनाज गिलवर (Shehnaaz Gill) झाला आहे.तसेच या दोघांचे चाहते अजूनही या जोडीला मिस करत आहेत.
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल बिग बॉस 13 मध्ये भेटले होते. प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री फारच आवडते. त्यामुळेच चाहत्यांनी त्यांच्या जोडीला सिडनाज असे नाव दिले आहे. या शोपासूनच सिडनाज हॅशटॅग खूप ट्रेंडवर होता. शो नंतर, शहनाज आणि सिद्धार्थ काही म्युझिक व्हिडीओ मध्ये एकत्र दिसले होते. सिद्धार्थच्या मृत्यूपूर्वी त्यांचा ‘हॅबिट’ नावाचा एक म्युझिक व्हिडिओ रिलीज होणार होता. मात्र या अचानक घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. आता सर्वलोक या घटनेचा स्वीकार करत सर्वसामान्य होत आहेत. दरम्यान सिडनाजच ‘हॅबिट’ हे सॉन्ग रिलीज करण्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे, पण त्याचे शीर्षक बदलण्यात आले आहे. त्यामुळे सिद्धार्थचे चाहते नाराज झाले आहेत. (**हे वाचा:** सिद्धार्थ शुक्ला-शेहनाज गिलचा म्यूझिक VIDEO लवकरच होणार रिलीज … ) सारेगामा या म्युझिक कंपनीने हा म्युझिक व्हिडिओ रिलीज करणार असल्याची घोषणा ट्विटरवरून केली आहे.मात्र त्यांनी या अल्बमचे शीर्षक बदलले आहे. आता या गाण्याचे नाव ‘हॅबिट’ वरून ‘अधुरा’ अस करण्यात आल आहे. म्युझिक कंपनीने एक पोस्टर रिलीज केले आहे, ज्यावर लिहिले आहे, “एक अधुरी गाणा , एक अधुरी कहानी … सिडनाज सॉन्ग … सिडनाज सॉन्ग लवकरच रिलीज होईल.” ही पोस्ट समोर येताच चाहत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. काही लोकांना या म्युझिक व्हिडिओचे पोस्टर आवडले आहे. तर काही चाहते गाण्याचे नाव बदलल्याबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत. (**हे वाचा:** Honsla Rakh: शेहनाज गिलच्या चित्रपटाचं नवं पोस्टर झालं रिलीज … ) नाराजी व्यक्त करत चाहत्यांनी म्हटलं आहे, ‘सिद्धार्थ आणि शेहनाजच्या या गाण्याचे नाव बदलणे चुकीचे आहे. आमच्या भावना सिद्धार्थच्या या गाण्याशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे हे गाणे ‘हॅबिट’ या मूळ शीर्षकाने रिलीज केले पाहिजे.या गाण्याच्या शूटिंगची छायाचित्रे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. यामध्ये दोघेही समुद्रकिनाऱ्यावर दिसून आले होते. ‘सिडनाज’ ने ‘भूला देगा’ आणि ‘शोना शोना’ या गाण्यांमध्ये एकत्र काम केले आहे.चाहत्यांनी दोन्ही गाण्यांना भरभरून प्रेम दिले होते.