मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच दाक्षिणात्य चित्रपटामध्ये उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेत्री श्रृती मराठे (Shruti Marathe)ने नाव कमवलं आहे. तिने सोशल मीडियावर काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
मराठी मालिका, चित्रपट,मॉडेलिंगच्या क्षेत्रात ठसा उमटवलेल्या अभिनेत्री श्रृती मराठे(Shruti Marathe)ने केलेलं फॉटोशूट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे. वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही प्रकारच्या कपड्यांमध्येही श्रृती सुंदर दिसते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंना अनेक लाइक्स आणि कॉमेंट्स येत आहेत.
9 ऑक्टोबर 1986 रोजी पुण्यामध्ये तिचा जन्म झाला. 2008 साली प्रदर्शित झालेल्या सनई चौघडे या सिनेमातून श्रृती मराठेने मराठी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल टाकलं.
झी मराठीवरील 'राधा ही बावरी' या मालिकेमुळे श्रृती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या श्रृतीची गाडी सुस्साट वेगाने धावायला लागली.
संत सखू, पेशवाई, जागो मोहन प्यारे या मालिकांमधून श्रृती झळकली आहे. सीरिअल्स सोबतच मॉडेलिंग विश्वातही श्रृतीने चांगलं नाव कमवलं आहे.
2014मध्ये मराठी कलाकारांनी एकत्र येत कलावंत ढोलताशा पथक सुरू केलं. या पथकात श्रृतीचा देखील सहभाग आहे. गणपतीमध्ये विसर्जन मिरवणुकीत श्रृती ढोल वाजवताना दिसते.
बंध नायलॉनचे, तप्तपदी, रमा माधव, मुंबई पुणे मुंबई 2 , सत्य सावित्री सत्यवान, तुझी माझी लव्ह स्टोरी,तिचा बाप त्याचा बाप, असा मी तसा मी अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.
मराठी आणि हिंदी प्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्येही तिने नाव कमावलं आहे. तामिळ भाषेतील इंदिरा विजहा या चित्रपटातून श्रृतीसाठी दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीची द्वारं उघडली.