‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे होय. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते.
'चला हवा येऊ द्या' च्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रेया बुगडे होय. श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते.
नुकताच श्रेयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून सर्वांच्याच मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. कारणही तसंच आहे.
श्रेया बुगडेनं वेस्टर्न ब्लॅक ड्रेसमध्ये आपले काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. मात्र एका वेगळ्याच गोष्टीमुळे ती चर्चेत आली आहे.
फोटोमध्ये श्रेयाने आपल्या गळयात एक खास लॉकेट घातला आहे. हा लॉकेट हुबेहूब बिग बॉसच्या लोगो प्रमाणे आहे. या लॉकेटमध्ये एक डोळा आहे. त्यामुळे तो थेट बिग बॉसच्या लोगोसारखाच वाटत आहे.
त्यामुळे श्रेयाच्या सर्व चाहत्यांना ती बिग बॉस मराठीमध्ये एंट्री करतेय कि काय? असा प्रश्न पडला आहे. चाहते हे जाणून घेण्यासाठी फारच उत्सुक झाले आहेत.
चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करून श्रेयाला तू बिग बॉसमध्ये येत आहेस का? असा साल केला आहे. मात्र श्रेयाने अजूनही यावर काहीही उत्तर दिलं नाही. त्यामुळे हा केवळ एक योगायोग असू शकतो.
सध्या बिग बॉस मराठी हा शो मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. शोमधील वादावादी, मैत्री,प्रेम, टास्क या गोष्टींनी प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे.