JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शिवजयंतीनिमित्त दिग्दर्शक रवी जाधव यांची मोठी घोषणा, लवकरच येणार 'बाल शिवाजी' भेटीला

शिवजयंतीनिमित्त दिग्दर्शक रवी जाधव यांची मोठी घोषणा, लवकरच येणार 'बाल शिवाजी' भेटीला

आज 19, फेब्रुवारी सगळीकडं शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्त मराठीतील प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव ( Ravi Jadhav ) यांनी त्यांच्या आगामी महत्त्वकांक्षी अशा सिनेमाची घोषणा केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 19 फेब्रुवारी- आज 19, फेब्रुवारी सगळीकडं शिवजयंतीचा (shivjaynti  )उत्साह पाहायला मिळत आहे. यानिमित्त मराठीतील प्रसिध्द दिग्दर्शक रवी जाधव ( Ravi Jadhav ) यांनी त्यांच्या आगामी महत्त्वकांक्षी अशा सिनेमाची घोषणा केली आहे. रवी जाधव दिग्दर्शित ‘बाल शिवाजी(Bal Shivaji) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या घोषणेसोबतच त्यांनी सिनेमाचं एक भव्य मोशन पोस्टरही आज सोशल मीडियावर शेअर केले आहे. रवी जाधव यांनी इन्स्टावर पोस्ट करत म्हटलं आहे की, अंधार गाडून, आभाळ फाडून, मातीचा हुंकार, आलाया! वाघाची संतान, डोळ्यात तुफान, कराया प्रहार, आलाया!!! गेली 8  वर्ष जे स्वप्न उराशी बाळगलं… सादर आहे त्याची ही पहिली झलक.आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मंगल दिनी इरॉस इंटरनॅशनल, आनंद पंडीत मोशन पिक्चर्स, रवी जाधव फिल्म्स आणि लिजंड स्टुडिओज सादर करीत आहेत एक भव्य दिव्य मराठी चित्रपट ‘बाल शिवाजी’…अशी पोस्ट करत त्यांनी सिनेमाचं एक भव्य मोशन पोस्टरही शेअर केले आहे. या पोस्टरला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित बातम्या

‘इरॉस इंटरनॅशनल’, ‘आनंद पंडित मोशन पिक्चर्स’, ‘रवी जाधव फिल्म्स’ आणि ‘लिजेंड स्टुडिओज’ प्रस्तुत आणि इरॉस इंटरनॅशनल’, ‘आनंद पंडित’, ‘रवी जाधव’ आणि संदीप सिंग निर्मित सॅम खान, रूपा पंडित सहनिर्मित मराठा आयकॉन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त ड्रीम प्रोजेक्ट ‘बाल शिवाजी’ची घोषणा केली. या चित्रपटाकरिता असोसिएट प्रोड्युसर म्हणून जय पंड्या भूमिका बजावत आहेत. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ते 16 वर्षांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करेल ज्याने त्यांना “स्वराज्य” चा पाया रचण्यात मदत केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या