मुंबई, 29 ऑगस्ट: ‘बिग बॉस 13’मुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल. अगदी कमी कालावधीत शहनाज सगळ्यांची लाडकी बनली. तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यापासून शहनाज सतत चर्चेत असते. अशातच शहनाजने चाहत्यांना एक मोठं सरप्राइज दिलं आहे. शहनाजनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मोठा धमाका केला आहे. शहनाज गिलने तिच्या इन्स्टाग्रामवर काही सेकंदाचा व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांना आनंदाचा मोठा धक्का दिला आहे. या व्हिडीओमधून शहनाजनं तिच्या आगामी बॉलिवूड चित्रपटाची घोषणा केली आहे. तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरत आहे. शहनाज आता रुपेरी पडद्यावर आपलं अभिनय कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. पुढील वर्षी 2023 मध्ये शहनाज गिल तिच्या चित्रपटाद्वारे चाहत्यांची दिवाळी खास बनवणार आहे.
चित्रपट दिग्दर्शक भूषण कुमार आणि अमर बुटाला यांनी साजिद खानच्या दिग्दर्शकीय उपक्रमासाठी 100% हातमिळवणी केली आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, रितेश देशमुख, नोरा फतेही आणि शहनाज गिल दिसणार आहेत. शहनाजने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांचा हा चित्रपट 100% एंटरटेनर असणार आहे आणि शहनाजच्या या खास भेटवस्तूमुळे प्रेक्षकांची दिवाळीही भव्य होईल. हेही वाचा - ‘मला गोमांस खायला आवडतं’; Boycott Brahmastra दरम्यान रणबीरचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहनाज सलमान खानच्या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शहनाज गिल सलमानच्या आगामी चित्रपटाच झळकणार असल्याचं सांगितलं जात होतं. अशातच आता शहनाजनं दुसऱ्याच नव्या चित्रपचाची घोषणा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. शहनाज गिलच्या चित्रपटात 20% कॉमेडी, 20% रोमान्स, 20% संगीत, 20% गोंधळ आणि 20% अॅक्शन असेल. त्यामुळे शहनाजचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांसाठी खूप उत्सुक आहेत.