JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / रीनाच्या नात्याबद्दल कळताच ढसाढसा रडले होते शत्रुघ्न सिन्हा

रीनाच्या नात्याबद्दल कळताच ढसाढसा रडले होते शत्रुघ्न सिन्हा

शत्रुघ्न यांनी सिनेमाप्रमाणे राजकारणातही नाव कमावलं. पण या सर्वांपेक्षा त्यांचं खासगी आयुष्य फार चर्चेत राहीलं.

0110

बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेले कलाकार आहेत. शत्रुघ्न यांनी सिनेमाप्रमाणे राजकारणातही नाव कमावलं. पण या सर्वांपेक्षा त्यांचं खासगी आयुष्य फार चर्चेत राहीलं. १९८० मध्ये शत्रुघ्न यांनी मिस इंडिया राहिलेल्या पूनम यांच्याशी लग्न केलं. पण त्यांचं नाव नेहमीच प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉय यांच्याशी जोडण्यात आलं.

जाहिरात
0210

शत्रुघ्न यांनी १९६९ मध्ये खलनायक म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. ‘प्यार ही प्यार’ हा त्यांचा पहिला सिनेमा. काही काळाने त्यांनी हिरो म्हणून सिनेमात काम करायला सुरुवात केली. यानंतर त्यांनी मागे वळून कधीच पाहिलं नाही. त्यांनी आपल्या करिअरमध्ये एकाहून एक सरस सिनेमांत काम केलं.

जाहिरात
0310

असं म्हटलं जातं की रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांची पहिली भेट १९७२ मध्ये ‘मिलाप’ सिनेमाच्या सेटवर झाली होती. यानंतर दोघांनी ‘कालीचरण’ सिनेमात काम केलं. हा सिनेमा दोघांच्याही करिअरमध्ये यश घेऊन आला. या सिनेमाच्या दरम्यान दोघं भावनिकरित्या जवळ आले. पण दोघांच्या नात्याला कोणतं नाव मिळालं नाही.

जाहिरात
0410

स्टारडस्ट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की, ‘रीनासोबतचं माझं नातं फार खासगी होतं. लोक म्हणतात की लग्नानंतर रीनासाठीच्या माझ्या भावना बदलल्या. पण या भावना वाढल्या. मी फार नशीबवान आहे की रीनाने तिच्या आयुष्याची सात वर्ष मला दिली.’

जाहिरात
0510

याबद्दल सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या बायोग्राफी ‘एनिथिंग बट खामोश’मध्ये खुलासा करत म्हटले की, ‘१९८२ मध्ये जेव्हा मी रीनाला एका सिनेमासाठी विचारले होते. तेव्हा रीनाने मला सांगितले की, तुमच्या मित्राला जाऊन सांगा की मी त्याच्या उत्तराची वाट पाहत आहे. जर त्यांचं उत्तर हो आहे तरच मी त्याच्यासोबत काम करेन नाहीतर पुढच्या आठ दिवसांमध्ये लग्न करेन.’

जाहिरात
0610

अशीही तेव्हा चर्चा होती की, रीना रॉयचं जेव्हा लग्नाची बातमी समोर आली तेव्हा शत्रुघ्न यांना अतीव दुःख झालं होतं. ते ढसाढसा रडले होते. रीना यांनी पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केलं होतं.

जाहिरात
0710

जेव्हा पहलाज यांनी फोनवर शत्रुघ्न यांच्याशी याबद्दल चर्चा केली. तेव्हा शत्रुघ्न फोनवर ढसाढसा रडू लागले. तेव्हा पहलाज यांनी त्यांचे मित्र शत्रुघ्न यांना सांगितले की, त्यांनी रीनाला आयुष्यात पुढे जाऊ द्यावं हेच सर्वांसाठी योग्य असेल. यानंतर रीनाने क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केलं.

जाहिरात
0810

एका मुलाखतीत शत्रुघ्न यांच्या पत्नी पूनम म्हणाल्या की, ‘जेव्हा मला दोघांच्या अफेअरबद्दल कळलं तेव्हा मी दोघांच्या रस्त्यातून दूर झाले. मात्र शत्रुघ्न यांना अशा मुलीशी लग्न करायचं नव्हतं जिच्यावर त्यांचा विश्वास नव्हता. लग्नानंतरही त्यांचं अफेअर सुरू असल्याचं मला माहीत होतं.’

जाहिरात
0910

शत्रुघ्न सिन्हा यांच्या अफेअरबद्दल त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा म्हणाली होती की, ‘जेव्हा हे सगळं झालं तेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. मी मोठी झाल्यावर मला या सगळ्या गोष्टी कळल्या. माझ्यासाठी या सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण नाहीत. माझ्यासाठी माझं कुटुंबच सर्वकाही आहे.’

जाहिरात
1010

रीना आणि तिच्या चेहऱ्यातील साम्याबद्दल बोलताना सोनाक्षी म्हणाली की, ‘माझा चेहरा जर कोणासारखा दिसत असेल तर तो माझी आई पूनम सिन्हासारखाच दिसतो.’

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या