JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शाहरुख खान ते करिना कपूर यांनी 'या' चित्रपटांसाठी घेतलं नाही कोणतंच मानधन! पाहा LIST मध्ये आणखी कोण?

शाहरुख खान ते करिना कपूर यांनी 'या' चित्रपटांसाठी घेतलं नाही कोणतंच मानधन! पाहा LIST मध्ये आणखी कोण?

बॉलिवूड सेलिब्रिटी चित्रपटांसाठी (movies) जास्त मानधन घेतात, असं तुम्ही ऐकलं असेल. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (box office) करोडो रुपयांची कमाई केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 6 जानेवारी-   बॉलिवूड (Bollywood)   कलाकार  घेत असलेलं कोट्यवधी रुपयांच्या मानधनाचे नुसते आकडे पाहून आपले डोळे पांढरे व्हायची वेळ येते. एकापेक्षा एक सुरपहिट चित्रपट देणाऱ्या कलाकारांच्या मानधनाची रक्कम ही वाढतच गेलेली तुम्ही अनेकदा ऐकलेही असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, अभिनेता सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान  (Shahrukh Khan )  यांच्यासह बॉलिवूडमध्ये स्वतःचे वर्चस्व निर्माण केलेले असे बरेच सेलिब्रिटी  (celebrities) आहेत, ज्यांनी काही चित्रपटांमध्ये मानधन न घेता काम केलंय. बॉलिवूड सेलिब्रिटी चित्रपटांसाठी (movies) जास्त मानधन घेतात, असं तुम्ही ऐकलं असेल. त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर (box office) करोडो रुपयांची कमाई केली. परंतु यापैकी काही सेलिब्रिटींनी एखाद्या चित्रपटाचा भाग होण्यासाठी कोणतेही मानधन घेतलेले नाही, असेही अनेकदा घडले आहे. यामध्ये सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत अनेक स्टार्सचा समावेश आहे.

अभिनेत्री करिना कपूर-खान ही अभिनेता सलमान खान याच्या ‘दबंग 2’ चित्रपटातील आयटम साँग ‘फेविकॉल से’ मध्ये दिसली होती. या गाण्यासाठी करिनाने कोणतेही मानधन घेतले नाही. या दोघांची चांगली मैत्री असल्यामुळे तिने एक पैसाही या आयटम साँगसाठी घेतला नव्हता. अभिनेता हृतिक रोशनच्या ‘अग्निपथ’ चित्रपटामधील ‘चिकनी चमेली’ हे आयटम साँग कतरिना कैफ हिने मानधन न घेता केलं होतं. बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘भूतनाथ’ चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान याने मानधन न घेता काम केलंय. अभिनेता अक्षय कुमारच्या ‘बॉस’ चित्रपटातील अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे ‘पार्टी ऑल नाईट’ हे गाणं खूप हिट झालं. या गाण्यासाठी तिने पैसे घेतले नव्हते. तसंच अभिनेता शाहिद कपूरच्या ‘हैदर’ या चित्रपटाला समीक्षकांची खूप प्रशंसा मिळाली, आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. पण या चित्रपटासाठी शाहिदने नाममात्र मानधन घेतलं होतं. अभिनेत्री राणी मुखर्जी हिचा करण जोहर हा चांगला मित्र आहे. त्यामुळेच त्याच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेसाठी राणीने एक पैसाही घेतला नव्हता.

सोनम कपूरनं घेतलं होतं अकरा रुपये मानधन अभिनेत्री सोनम कपूर हिने ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटातील भूमिकेसाठी केवळ 11 रुपये मानधन घेतलं होतं. तर, अभिनेता इरफान खानच्या ‘बिल्लू’ चित्रपटात ‘यू गेट मी रॉकिंग अँड सेलिंग’ नावाचं गाणं अभिनेत्री प्रियंका चोप्राने विनामानधन केलं होतं. बॉलिवूडची क्विन म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दीपिका पदुकोण हिने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटासाठी तिने कुठलंही मानधन घेतलं नव्हतं. अभिनेता अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ चित्रपटामध्ये एका गाण्यात सलमान खान दिसला होता. या गाण्यासाठी त्याने एकही रुपया घेतला नव्हता.बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या काही सेलिब्रिटींची संपत्ती ही कोट्यावधीची आहे. विविध सुपरहिट चित्रपट देताना हे सेलिब्रिटी प्रचंड मानधन घेतात. पण कधीकधी अपवादात्मक परिस्थितीमध्ये हेच कलाकार विनामानधन चित्रपटात काम करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या