मुंबई, 26 ऑगस्ट : अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणून ओळखले जातात. दोघेही कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत कनेक्ट राहतात. कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेलं हे कपल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. मीरा कपूरने सोशल मीडियावर शाहिदसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय. मीरा कपूरने तिच्या इन्स्टाग्रामवर शाहिदसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करण्यामागचं खास कारण म्हणजे आज शाहिद आणि मीराची मुलगी मीशा कपूरचा वाढदिवस आहे. मीशाच्या वाढदिवसाप्रसंगी मीरानं हा खास फोटो शेअर केलाय. मीरानं शेअर केलेला हा फोटो मीशाच्या डिलिव्हरीच्या आदल्या रात्रीचा आहे. फोटोमध्ये मीरा कपूर तिचा बेबी बंप पकडून विश्रांती घेत आहे आणि तिला प्रसूती वेदना होत असल्याचे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे, तर शाहिद कपूर सेल्फीच्या माध्यमातून ही सुंदर आठवण टिपताना दिसत आहे.
मीरानं ही सुंदर आठवण शेअर करत म्हटलं की, ‘6 वर्षांपूर्वी, त्या रात्री, हा क्षण… तू आधीच बाहेर येऊ शकतेस का? आणि मग सर्वात सुंदर गोष्ट घडली’. मीरानं शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधत असून व्हायरल होत असलेला पहायला मिळत आहे. हेही वाचा - Sidhu Moosewala च्या चाहत्यांसाठी खूशखबर; सिद्धूचं नवं गाणं ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित दरम्यान, शाहिदने 2015 मध्ये मीरासोबत लग्नगाठ बांधली. 26 ऑगस्ट 2016 रोजी त्यांची मुलगी मिशा कपूर या जगात आली आणि ते पालक बनले. यानंतर 5 सप्टेंबर 2018 रोजी मुलगा झैन कपूरच्या जन्माने त्यांचं छोटं कुटुंब पूर्ण झालं. शाहिद आणि मीरा आपल्या मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवण्यास प्राधान्य देतात मात्र त्यांची झलक सोशल मीडियातून पहायला मिळतेच.