JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / शाहिद कपूरच्या आगामी 'jersey' चित्रपटाची अभिनेत्री मृणाल ठाकूरला कोरोनाची लागण

शाहिद कपूरच्या आगामी 'jersey' चित्रपटाची अभिनेत्री मृणाल ठाकूरला कोरोनाची लागण

बॉलिवूडमध्ये (Bollywood) एकापाठोपाठ एक कोरोना केसेस समोर येत आहेत. अर्जुन कपूर, नोरा फतेहीनंतर आता शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटातील अभिनेत्री मृणाल ठाकूरला (Mrunal Thakur) कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जानेवारी-   बॉलिवूडमध्ये  (Bollywood)  एकापाठोपाठ एक कोरोना केसेस समोर येत आहेत. अर्जुन कपूर, नोरा फतेहीनंतर आता शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटातील अभिनेत्री मृणाल ठाकूरला   (Mrunal Thakur)  कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने स्वतः आपल्या इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने काही वेळेपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे, ‘आज माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला सौम्य लक्षणे आहेत. माझी प्रकृती ठीक आहे. परंतु सध्या मी होम आयसोलेशनमध्ये आहे.मी सध्या कोरोना नियमांचं पालन करत आहे.’ असं म्हणत अभिनेत्रीने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट केलं आहे. तसेच मृणालने आपल्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना कोरोना टेस्ट करून घेण्याचं आवाहन केलं आहे. मृणाल ठाकूर आपल्या आगामी ‘जर्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती शाहिद कपूरसोबत झळकणार आहे. नुकताच या चित्रपटातील गाणं रिलीज झालं होतं. प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री फारच पसंत पडत आहे. सध्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकताच मृणाल आणि शाहिद कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी झाले होते. मृणालने फारच कमी वेळेत बॉलिवूडमध्ये आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. मृणाल ठाकूरने आपल्या अभिनयाची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली आहे. एकता कपूरच्या ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती. यामध्ये तिने ‘बुलबुल’ ची भूमिका साकारली होती. बॉलिवूडमध्ये अनेक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकताच नोरा फतेही, अभिनेता अर्जुन कपूरसोबत बहीण अंशुला कपूर, सोनम कपूरची बहीण रिया कपूर आणि तिचा पती करण बुलानी यांनासुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर शौरीच्या १० वर्षांच्या मुलाला कोरोनाची लागण झाली होती. रणवीर आपल्या मुलासोबत गोव्याला व्हेकेशनला गेला होता. दरम्यान परतताना त्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तसेच काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या पार्टीत सहभागी झालेल्या करिना कपूर, महिप कपूर,शनाया कपूर, अमृता अरोरा यांनासुद्धा कोरोनाची लागण झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या