मुंबई, 28 ऑगस्ट- मुंबईमध्ये आपल्या स्वतः च्या कमाईतून घेतलेलं एक घर असावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. कधी कोणाची ही इच्छा पूर्ण होते तर कधी अपूर्ण राहते. आणि करिअरच्या सुरुवातीलाच जर हे स्वप्न पूर्ण झालं तर त्या व्यक्तीला भाग्यवानच म्हणावं लागेल. असंच काहीसं अभिनेता ईशान खट्टरसोबत झालं आहे. शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरने नुकतंच मुंबईत एक आलिशान घर खरेदी केलं आहे. शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय तरुण कलाकारांपैकी एक आहे. खूप वर्षांपूर्वी ईशाननेही स्वप्ननगरी मुंबईत आपलंही सी-फेसिंग आलिशान घर असावं असं स्वप्न पाहिलं होतं. आणि आज या अभिनेत्यानं आपलं स्वप्न साकार केलं आहे. ‘धडक’ फेम ईशान खट्टरच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ईशानने नुकतंच मुंबईत सी-फेसिंग आलिशान घर खरेदी केलं आहे. ईशान खट्टरने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या नव्या आलिशान घराची पहिली झलक शेअर केली आहे. ईशानने आपल्या घराचा व्हिडिओ शेअर करत लिहलंय की, ‘घर ही माझ्यासाठी नेहमीच एक अत्यंत खाजगी जागा राहिली आहे. परंतु माझं स्वतःच पहिलं घर बनवणं ही प्रचंड आनंददायी प्रक्रिया होती. मला तुम्हाला आमंत्रित करण्यात आनंद होत आहे. माझ्या आयुष्यातील हा एक मैलाचा दगड आहे!‘असं म्हणत अभिनेत्यानं आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टवरुन ईशान किती आनंदी आहे याचा अंदाज लावला जावू शकतो.
**(हे वाचा:** Sonam Kapoor : सोनम कपूरच्या चिमुकल्याचं मावशीने ठेवलंय ‘हे’ नाव; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य ) ईशानचं घर वेस्ट एल्म इंडियानं डिझाइन केलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता म्हणत आहे की, ‘माझं घर मॉडर्न दिसावं पण त्याला क्लासिकल टचही असावा अशी माझी इच्छा होती. सोबतच अभिनेत्यानं म्हटलंय, मला या जागेचा मनापासून आनंद घ्यायचा आहे.अभिनेत्याचं हे घर क्लासिक आणि मॉडर्न कलाकृतीचं एक उत्तम उदाहरण म्हटलं जात आहे. ईशानच्या घराची पहिली झलक समोर येताच. चाहतेच नव्हे तर इतर सेलिब्रेटीही त्याच कौतुक करत आहेत. अभिनेत्याचं घर प्रचंड सुंदर असल्याचं चाहते म्हणत आहेत. आलिया भट्टच्या आई सोनी राजदं यांनीसुद्धा ईशानचं कौतुक करत त्याच्यावर प्रेम व्यक्त केलं आहे.