शाहरुख खान (Shah Rukh Khan) आलियाच्या या कामामुळे प्रचंड खुश आहे.
आलिया भट्टनं (Alia Bhatt) डार्लिंग्स (Darlings) चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं आहे. या चित्रपटाद्वारे तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे.
आलियानं सेटवरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि चाहत्यांना माहिती दिली की ती शूटिंगच्या पहिल्या दिवशी उत्साहित आहे आणि थोडी घाबरलेली सुद्धा आहे.
शाहरुख खान (Shah Rukh Khan) आलियाच्या या कामामुळे प्रचंड खुश आहे. लक्षवेधी बाब म्हणजे त्यानं आलियाला स्वतःसाठी काम देखील मागितलं आहे.
“या प्रॉडक्शन नंतर कृपया मला तुमच्या होम प्रॉडक्शनच्या पुढील प्रोजेक्टसाठी संधी द्या. मी शूटसाठी वेळेवर येईन आणि व्यावसायिक वागणूक ठेवेन” अशा आशयाचं ट्विट करुन शाहरुखनं आलियाकडे काम मागितलं आहे.
सेटवर परत आल्यामुळे खूप आनंद झाला आहे आणि मी उत्साहित आहे. बर्याच दिवसांपासून या चित्रपटाबद्दल उत्साही होते. अशा आशयाची पोस्ट लिहून आलियानं निर्मिती क्षेत्रात पदार्पण केल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली.