सारा सध्या काश्मीरच्या खोऱ्यात निसर्गाचा आनंद घेत आहे. साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो खूपच खास आहेत.
अभिनेत्री सारा अली खान सध्या विविध ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत आहे. कधी मालदीव तर कधी गोवा, कधी लडाख तर कधी काश्मीर असा तिचा सैरसपाटा चालू आहे. नुकताच ती मालदीवमधून आपले फोटो शेअर करत होती. त्यांनतर आत्ता सारा काश्मीरमध्ये पोहोचली आहे. आणि तेथून ती नमाज पठणही करत आहे. आणि प्रार्थनाही करत आहे.
सारा सध्या काश्मीरच्या खोऱ्यात निसर्गाचा आनंद घेत आहे. साराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो खूपच खास आहेत. कारण यातून सारा 'सर्व धर्म सम भाव' चा संदेश देत आहे.
या फोटोमध्ये साराने जहांगीरने फारसी शब्दात म्हटलेलं एक वाक्य म्हटलं आहे. त्याचा आशय असा होतो, 'जगात कुठे स्वर्ग आहे, तर तो फक्त इथे इथे आहे आणि इथे आहे'. याच फोटोमध्ये साराने सर्व धर्म सम भावचा संदेश दिला आहे.
तसेच साराने मस्जिद शरीफ बाहेरचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री नमाज पठण करताना दिसून येत आहे. साराची आई अमृता सिंह ही हिंदू कुटुंबातील आहे तर वडील सैफ अली खान हे मुस्लिम कुटुंबातील आहेत. त्यामुळे सारावर दोन्ही कुटुंबाचा प्रभाव आहे.
आपल्या या फोटोमध्ये अभिनेत्री सारा अली खान अगदी निष्ठेने आणि पूर्ण श्रद्धेने धागा बांधताना दिसून येत आहे. याला 'मन्नत का धागा' असं म्हटलं जातं.
त्याचबरोबर साराने आपल्या या फोटोमध्ये मंदिर, गुरुद्वारा आणि चर्चची काही छायाचित्रे शेअर केली आहेत. हे सर्व पाहून सर्वानाच साराचं कौतुक वाटत आहे.