santosh juvekar
मुंबई, 8 सप्टेंबर : देशभरात सर्वत्र गणेशोत्सवाचा जल्लोष पहायला मिळत आहे. दोन वर्षाच्या लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असून सगळेच आनंदी आहेत. दोन वर्षाच्या कालावधीनंत बाप्पाचं आगमन थाटामाटात झालं आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेक कलाकार त्यांच्या प्रोजक्टविषयी घोषणा करत आहे. अशातच अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी घोषणा केली आहे. अभिनेता संतोष जुवेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यानं आपल्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती दिली आहे. संतोष जुवेकरचं लवकरच नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून याविषयी त्याने चाहत्यांना माहिती दिली आहे. ‘बापाच्या चरणी अर्पण करून लवकरच तुमच्यासाठी घेऊन येतोय “मोरया रे” गाणं’, असं म्हणत त्यानं गाण्याचं पोस्टर शेअर केलं आहे. या घोषणेमुळे त्याचे चाहते आनंदी झाल्याचं दिसतंय. संतोषची ही पोस्ट सध्या अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्याचे चाहतेही पोस्टवर अनेक कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.
संतोष सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करतो. आगामी प्रोजेक्टविषयीसुद्धा तो चाहत्यांसोबत शेअर करताना पहायला मिळतो. चाहतेही त्याच्या फोटोंवर, व्हिडीओंवर भरभरुन प्रेम देतात. हेही वाचा - Gauri Ingawale : 22 वर्षांची झाली मांजरेकरांची लेक; स्टनिंग पोझेस देत वेधतेय साऱ्यांचंं लक्ष संतोषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं अनेक मराठी चित्रपट मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय त्यानं अनेक वेबसिरिजमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. याशिवाय संतोषनं बॉलिवूडमध्येही काम केलंय. त्यानं आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात एक वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे.