मुंबई, 13 जानेवारी- स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सांग तू आहेस का’ (Sang Tu Aahes Ka ) या मालिकेद्वारे महाराष्ट्राच्या घराघराच पोहचलेल्या अभिनेत्री सानिया चौधरीला (sania chaudhary corona positive) कोरोनाची लागण झाली. सोशल मीडियाच्या माध्यमतून तिनं ही माहिती दिली आहे. सानिया चौधरीनं तिच्या इन्स्टा स्टोरीला तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. तिनं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, माझी कोरोनी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आजचा पाचवा दिवस आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे पण सर्वांनी मास्क घाला. तसेच लसीचे दोन डोस घेण्याचे आवाहन देखील तिनं केले आहे.
सानिया मूळची पुण्याची आहे. लहानपणापासूनच सानियाला अभिनय आणि नृत्याची आवड होती. त्यामुळे पुण्यातच तिने नृत्य शिकण्यासोबतच अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. अनेक वर्कशॉप्स, नाट्यस्पर्धा आणि थिएटर केल्यानंतर तिला हिंदी वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी मिळाली. यानंतर तिनं स्टार प्रवाहच्या ‘सांग तू आहेस का’ मालिकेसाठी ऑडिशनसाठी दिली. पाच ते सहा वेळा ऑडिशन आणि लुक टेस्ट दिल्यानंतर तिची वैदेही या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली. सांग तू आहेस का ही तिची पहिली मालिका होती. सानिका सोशल मीडियावर देखील सक्रिय असते.ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. वाचा- रोज नव्या नावाची भर, अरोह वेलणकरसह या मराठी कलाकारांना झाला कोरोना आजच्या दिवसात मराठी मनोरंजन विश्वातील तीन कलाकारांना कोरोणाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गौतमी देशपांडे, अरोह वेलणकर याच्या नंतर सानिया चौधरी हिला देखील कोरोना झाल्याची माहिती समोर आले आहे. बॉलिवूड असेल किंवा हिंदी टीव्ही जगतातील सेलेब्स व त्यांच्या घरच्यांना कोरोना झाल्याच्या दररोज बातम्या समोर येत आहेत. तिसऱ्या लाटेचा फटका मनोरंजन विश्वाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. देशभरातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सरकार देखील नियमांचे पालन करण्याचे व मास्क घालण्याचे वारंवार अवाहान करत आहे.