JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ‘मी स्त्री आहे वस्तू नाही’; ‘आयटम गर्ल’ पुकारताच संदीपा धार संतापली

‘मी स्त्री आहे वस्तू नाही’; ‘आयटम गर्ल’ पुकारताच संदीपा धार संतापली

आयटम गर्ल हा शब्द काढून टाकण्यात यावा अशी देखील मागणी केली.

0110

दबंग 2 या चित्रपटातून नावारुपास आलेली संदीपा धार ही बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

जाहिरात
0210

खरं तर संदीपा एक अष्टपैलू अभिनेत्री आहे. तिनं आतापर्यंत सहाय्यक अभिनेत्रीपासून खलनायिकेपर्यंत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. तरी देखील तिला चाहते आयटम गर्ल म्हणूनच ओळखतात.

जाहिरात
0310

संदीपानं कागज चित्रपटात लालम लाल या आयटम साँगवर केलेला डान्स प्रचंड गाजला होता. त्यामुळं आता तिचा चाहते आयटम गर्ल म्हणूच ओळखतात. परंतु ही ओळख संदीपाला आवडलेली नाही. याबाबत तिनं आपली नाराजी व्यक्त केली आहे.

जाहिरात
0410

तिनं स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं आयटम हा शब्दावर संताप व्यक्त केला.

जाहिरात
0510

ती म्हणाली, “एखाद्या अभिनेत्रीला उल्लेख आयटम असा करणं चुकीचं आहे. आपण एखाद्या वस्तूला आयटम म्हणतो त्यामुळं त्या स्त्रीची तुलना वस्तूशी केली जात असल्याचा भास होतो.”

जाहिरात
0610

“मला लोक आयटम गर्ल म्हणतात. त्याऐवजी त्यांनी स्पेशल डान्सर म्हणावं. कारण आयटम गर्ल या शब्दाचा मला प्रचंड राग येतो. विविध भूमिका साकारल्यानंतरही लोक तुम्हाला अभिनेत्रीऐवजी आयटम म्हणून हाक मारतात हे अत्यंत अपमानास्पद वाटतं.”

जाहिरात
0710

या मुलाखतीत तिनं आयटम गर्ल हा शब्द काढून टाकण्यात यावा अशी देखील मागणी केली.

जाहिरात
0810

पुढे ती म्हणाली, “कदाचित मोठ्या अभिनेत्रींना या शब्दाबद्दल काही वाटत नसेल पण या शब्दाद्वारे चित्रपटात डान्स करणाऱ्या त्या सर्व अभिनेत्रींचा अपमान केला जातोय.”

जाहिरात
0910

संदीपानं इस लाईफ मे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली होती. दबंग आणि हिरोपंती या चित्रपटामुळं ती खऱ्या आर्थानं प्रकाशझोतात आली होती.

जाहिरात
1010

अलिकडेच ती मुम भाई या अल्ट बालाजीच्या वेब सीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमध्ये तिनं केलेले हॉट सीन्स देखील प्रचंड चर्चेत होते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या