JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Fat समीरा रेड्डी कशी झाली Fit? वजन कमी करण्यासाठी वापरली अनोखी टेकनिक

Fat समीरा रेड्डी कशी झाली Fit? वजन कमी करण्यासाठी वापरली अनोखी टेकनिक

पाहा 80 किलोच्या समीरा रेड्डीनं कसं केलं वजन कमी? चाहत्यांना दिला अनोख्या टिप्स

0107

समीरा रेड्डी (Sameera Reddy) ही कधीकाळी बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. चित्रपटांमधील बोल्ड सीन्समुळं ती नेहमीच चर्चेत असायची.

जाहिरात
0207

बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही आपल्या मादक अदांची जादू दाखवणाऱ्या समीरानं स्वत:चा असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. परंतु लग्न होताच तिच्या करिअरला उतरती कळा लागली. मग तिचं वजन वाढलं अन् त्यानंतर ती एकाएकी सिनेसृष्टीतून गायब झाली.

जाहिरात
0307

सध्या समीरा सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी संपर्कात आहे. ती महिलांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करते. याच दरम्यान समीरानं आपलं ट्रान्सफॉर्मेशन दाखवून सर्वांनाच चकित केलं.

जाहिरात
0407

दोन मुलं झाल्यानंतर समीराचं वजन 80 किलोच्या आसपास गेलं होतं. यामुळं ती काही काळा ड्रिप्रेशनमध्ये देखील होती. परंतु या परिस्थितीवर मात कर स्वत:चं वजन नियंत्रणात आणलं आहे.

जाहिरात
0507

वजन कमी करण्यासाठी समीरानं इंटरमिटेड फास्टिंग (intermittent fasting) या प्रकराचा वापर केला. या अनोख्या डाएटिंगद्वारे तिनं आपलं वजन चमत्कारिकपणे कमी केलं. याचा पुरावा दाखवण्यासाठी तिनं काही फोटो देखील शेअर केले आहेत.

जाहिरात
0607

इंटरमिटेड फास्टिंग म्हणजे दिवसातील एक ठराविक काळ काहीच खायचं नाही. व आहारात केवळ प्रोटिन घ्यायेच. फायबर किंवा काब्स घ्यायचे नाहीत. त्यामुळं वजन कमी करण्यास मदत होते असा दावा समीरानं एका व्हिडीओद्वारे केला आहे.

जाहिरात
0707

शिवाय केवळ चांगलं डाएट करुन वजन कमी होत नाही. सोबतच व्यायाम, योगा, पुरेशी झोप आणि भरपूर पाणी पिणे या गोष्टी कटाक्षाने फॉलो कराव्या लागतात. तरच तुम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळू शकेल. असा सल्ला समीरानं वजन कमी करु इच्छिणाऱ्या चाहत्यांना दिला.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या