JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / …म्हणून पहाटे 3 वाजेपर्यंत सलमान ऐश्वर्या रायचा दरवाजा वाजवत होता

…म्हणून पहाटे 3 वाजेपर्यंत सलमान ऐश्वर्या रायचा दरवाजा वाजवत होता

ज्या पद्धतीने सलमान ऐश्वर्यावर प्रेम करायचा, तसं प्रेम ऐश्वर्याने कधीच त्याच्यावर केलं नाही. यामुळेच सलमान हिंसक झाला होता.

0107

जेव्हाही बॉलिवूडमध्ये ब्रेकअपच्या चर्चा होतात त्यात सलमान खानचं नाव नेहमीच अग्रणी असतं. आतापर्यंत सलमानचं प्रत्येक नातं चर्चेत आलं. पण ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपची जेवढी चर्चा झाली तेवढी कोणाच्याच ब्रेकअपची झाली नसेल.

जाहिरात
0207

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणप्रमाणे या दोघांचं अफेअरही संजय लीला भन्साळी यांच्या सेटवर सुरू झालं. ‘हम दिल दे चुके सनम’ सिनेमातून दोघं पहिल्यांदा एकत्र काम करत होती.

जाहिरात
0307

चित्रीकरणादरम्यानच त्यांच्यात प्रेम खुलत गेलं. सलमानच्या घरच्यांसोबत आणि बहिणींसोबतही ऐश्वर्याचं बॉण्डिंग चांगलं होत चाललं होतं. पण ऐश्वर्याच्या घरच्यांना हे नातं मान्य नव्हतं.

जाहिरात
0407

सलमानचं हिंसक वागणं- 2001 मध्ये अशी एक घटना घडली की सलमानचा रागीट चेहरा सर्वांसमोर आला. एकदिवस सलमान ऐश्वर्याच्या घराबाहेर पोहोचला आणि मध्यरात्री तीन वाजेपर्यंत तो तिचा दरवाजा जोरजोरात वाजवत राहिला. तो सारखा घरात घेण्याचं बोलत होता.

जाहिरात
0507

शेवटी ऐश्वर्याने रात्री 3 वाजता दरवाजा उघडला. तिथे उपस्थित लोकांनी सांगितल्याप्रमाणे तेव्हा सलमान रागाने लालबूंद झाला होता.

जाहिरात
0607

मीडिया रिपोर्टनुसार, सलमानने एका मुलाखतीत स्पष्ट केले की, ज्या पद्धतीने सलमान ऐश्वर्यावर प्रेम करायचा, तसं प्रेम ऐश्वर्याने कधीच त्याच्यावर केलं नाही. यामुळेच सलमान हिंसक झाला.

जाहिरात
0707

2002 मध्ये ऐश्वर्याने स्पष्ट केलं की तिचं सलमानशी ब्रेकअप झालं आहे. ऐश्वर्यामुळे सलमान आणि विवेक ओबेरॉयमध्येही वाद झाले.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या