JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सलमान आणि संजय दत्तचे वकील सतीश मानेशिंदे लढणार रियाची केस; एका दिवसाची फी वाचून बसेल धक्का

सलमान आणि संजय दत्तचे वकील सतीश मानेशिंदे लढणार रियाची केस; एका दिवसाची फी वाचून बसेल धक्का

सतीश मानेशिंदे यांचं नाव अत्यंत महागड्या वकिलांच्या यादीत घेतलं जातं..त्यांची फि वाचून तुम्ही अवाक् व्हाल

0105

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये आता सुशांतच्या कुटुंबीय पुढे आले आहे. सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुशांतचे वडील केके सिंह यांनी अनेक आरोप केले आहेत. यानंतर रियानेही केस दाखल होताच देशातील सर्वात महागड्या वकिलांमधील सतीश मानशिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

जाहिरात
0205

सतीश मानशिंदे यांनी सलमान खान आणि संजय दत्त यांची केस लढली होती. बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे. तर रियाने केस जिंकण्यासाठी सतीश मानशिंदे यांना हायर केलं आहे. सतीश यांनी संजय दत्त याचा 1993 मधील मुंबई ब्लास्ट केस आणि सलमान खान याचा 1998 मधील ब्लॉकबक केस लढली होती.

जाहिरात
0305

पाटण्यात केस दाखल होताच येथे सतीश मानशिंदे यांची ज्युनिअर वकील आनंदिनी फर्नांडिस या रियाच्या घरी पोहोचल्या. येथे दोघांमध्ये बरीच चर्चा झाली. दुसरीकडे सतीश मानशिंदे यांनी मुंबई पोलिसांनीच या प्रकरणाता तपास करावा असा विनंती अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे.

जाहिरात
0405

सतीश मानेशिंदे हे देशातील सर्वात महागड्या वकिलांच्या यादीतील प्रमुख नाव आहे. ते महागड्या गाड्यांच्या आवडीसाठीही ओळखले जातात. कोर्टात सादर होण्यासाठी एका दिवसाचे ते 10 लाख रुपये घेत असल्याचे सांगितले जात आहे. हा 2010 चा आकडा आहे.

जाहिरात
0505

पाटणा पोलिसांची चार सदस्यीय टीम मुंबईत पोहोचली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पाटण्यात रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयाविरोधात आयपीसीअंतर्गत 306, 341, 342, 380, 406, 420 कलमं लावली आहेत. या प्रकरणात पोलीस रियाला ट्रान्जिट रिमांडमध्ये घेऊ शकते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या