JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bigg Boss Marathi फेम सई लोकूर मालदीवमध्ये पतीसोबत झाली रोमँटिक; शेअर केले खास फोटो

Bigg Boss Marathi फेम सई लोकूर मालदीवमध्ये पतीसोबत झाली रोमँटिक; शेअर केले खास फोटो

‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाने प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर होय. सई लोकूर सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो शेयर करत असते.

0106

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या पर्वाने प्रचंड लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर होय. सई लोकूर सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. ती सतत आपले व्हिडीओ आणि फोटो शेयर करत असते.

जाहिरात
0206

सईने नुकताच आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्या पतीसोबत काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती पती तीर्थदीप रॉयसोबत रोमँटिक अंदाजात ब्रेकफास्ट करताना दिसत आहे. दोघेही फारच गोड दिसत आहेत.

जाहिरात
0306

सध्या मराठमोळी अभिनेत्री सई लोकूर आपल्या पतीसोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. विशेष म्हणजे लग्नाच्या १० महिन्यांनंतर सई आपल्या पतिसोबत हनिमूनसाठी गेली आहे. ती सतत मालदीवमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अपडेट्स चाहत्यांना देत आहे.

जाहिरात
0406

सई लोकूरने १० महिन्यांपूर्वी तीर्थदीप रॉयसोबत लग्न केलं आहे. सुरुवातीला सईने आपल्या साखरपुड्याचा फोटो सशेअर करत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी अभिनेत्रीने लग्न केलं होतं. या दोघांचं लग्नदेखील चांगलंच चर्चेत आलं होतं.

जाहिरात
0506

सई आणि तीर्थदीपची लव्हस्टोरीसुद्धा फारच इंटरेस्टिंग होती. यांच्या लव्हस्टोरीची मोठी चर्चा रंगली होती. कारण हे दोघे मॅट्रोमोनी सोशल मीडिया साईटवर भेटले होते. येथेच या दोघांची ओळख झाली होती. त्यांनतर या दोघांनी एकमेकांना पसंत केलं होतं, आणि लग्नाचा निर्णय घेतला होता.

जाहिरात
0606

सई लोकूरने बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वत सहभाग घेतला होता. या शोमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. अभिनेत्री या घरामध्ये तब्बल १०० दिवस टिकून राहिली होती. चाहत्यांनी सईला मोठा सपोर्ट केला होता. मात्र ती हा सो जिंकू शकली नव्हती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या