JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / `सॅक्रेड गेम्स`मधील `या` अभिनेत्रीची इंटिमेट सीननंतर झाली होती बिकट अवस्था

`सॅक्रेड गेम्स`मधील `या` अभिनेत्रीची इंटिमेट सीननंतर झाली होती बिकट अवस्था

नेटफ्लिक्सवर सर्वात अधिक गाजलेली वेबसीरिज सॅक्रेड गेम्समध्ये (Sacred Games)कुकू या ट्रान्स महिलेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कुब्रा सैत (Kubra Sait) हिने या शोमधल्या इंटिमेट सीनविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.

जाहिरात

Kubbra sait

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ला, 25 ऑक्टोबर : ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) हा मनोरंजनासाठीचा एक नवा पर्याय गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाला आहे. सध्या अनेक ओटीटी चॅनेल सब्स्क्रिप्शनवर किंवा नि:शुल्क उपलब्ध आहेत. कोरोना काळात चित्रपटगृहांवर निर्बंध आल्यानं प्रेक्षकांचा मनोरंजनासाठी `ओटीटी`कडे कल अधिक प्रमाणात होता. काही चित्रपटही या प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्याचं पाहायला मिळालं. नेटफ्लिक्स (Netflix) हा सर्वाधिक लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. यावरील अनेक वेबसीरिज लोकप्रिय तर ठरतातच परंतु त्यांची खूप चर्चाही होते. नेटफ्लिक्सवरची सॅक्रेड गेम्स (Sacred Games) ही अशी गाजलेली वेबसीरिज. या वेबसीरिजमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीसारखे (Nawazuddin Siddiqui) आघाडीचे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. या वेबसीरिजमध्ये `कुकू` या ट्रान्स महिलेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कुब्रा सैत (Kubra Sait) हिने या शोमधल्या इंटिमेट सीनविषयी (Intimate Scene) भाष्य केले आहे. या वेबसीरिजमध्ये तिनं नवाजुद्दिन सिद्दीकीसोबत बोल्ड सीन दिला होता. या सीनच्या शूटिंगच्या वेळी कुब्राची काय स्थिती झाली होती, याविषयी तिनं सांगितलं आहे. याबाबतचं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने दिलं आहे. मॅशेबल इंडियाशी बोलताना कुब्रा सैतनं सांगितलं, `मी जेव्हा या सीनसाठी पहिला टेक केला तेव्हा दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) आला आणि म्हणाला की पुढचा टेक आपण लवकर करू. दुसरा टेक झाल्यानंतर तो पुन्हा म्हणाला की पुढचा टेकही आपण लवकर करू. तिसऱ्या वेळी जेव्हा मी सीन केला तेव्हा त्यानं कॅमेराची जागा बदलून तो नवाजुद्दीन सिद्दीकीजवळ शिफ्ट केला. अशा पद्धतीनं आम्ही सीन करत गेलो. परंतु, सलग सातव्यांदा मी या सीनचा टेक करत होते, तेव्हा मी पूर्णतः नर्व्हस झाले होते. मी खूप भावनिक झाले होते, त्याच दरम्यान अनुराग कश्यप माझ्याजवळ आला आणि मला `धन्यवाद, आपण बाहेर भेटू`, असं म्हणाला. तेव्हा हा सीन संपल्याची जाणीव मला झाली.` अनुराग कश्यप शूटिंगच्या ठिकाणाहून गेल्यानंतर मी मनातून अगदी कोसळून गेले होते. मी जमिनीवर पडले होते आणि रडत होते. मला रडू आवरत नव्हतं. त्या वेळी नवाजुद्दीन सिद्दीकी मला म्हणाला, की `मला वाटतं की तू आता बाहेर जावं. कारण माझे सीन अजून बाकी आहेत. त्यांच्या एंट्रीचा सीन शूट करणं तोपर्यंत बाकी होतं,` असं कुब्रा सैतनं मुलाखतीदरम्यान बोलताना सांगितलं. `डीएनए इंडिया`ने दिलेल्या वृत्तानुसार, कुब्रा सैतनं एका मुलाखतीत सांगितलं की ``सॅक्रेड गेम्समधील तिच्या नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत दाखवण्यात आलेल्या बोल्ड सीनचं शूटिंग 7 वेळा करण्यात करण्यात आलं होतं. कारण दिग्दर्शक अनुराग कश्यपला हा सीन वेगवेगळ्या अॅंगल्समधून (Angles) दाखवायचा होता. अनुराग कश्यप यांनी प्रत्येक अॅंगलनं हा सीन शूट (Shoot) केला. कारण शूटिंग योग्य पद्धतीनं होत आहे की नाही याची खात्री त्यांना करून घ्यायची होती.`

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या