JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बिग बींच्या पुढे गेला सचिन, बाॅक्स आॅफिसवर पहिल्याच दिवशी रेकाॅर्ड

बिग बींच्या पुढे गेला सचिन, बाॅक्स आॅफिसवर पहिल्याच दिवशी रेकाॅर्ड

पहिल्याच दिवशी ८.४० कोटींची कमाई केली. आणि बिग बींच्या सरकार 3ला मागे टाकलं.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

28 मे : सचिनचा सिक्स, प्रेक्षकांचा एकच गोंगाट. सचिन आऊट, प्रेक्षकांमध्ये सन्नाटा. हे दृश्य आहे ‘सचिन-अ बिलियन ड्रीम्स’ सिनेमाच्या थिएटर्सचं. हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय. इतका की सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठा रेकॅार्ड बनवला. पहिल्याच दिवशी ८.४० कोटींची कमाई केली. आणि बिग बींच्या सरकार 3ला मागे टाकलं. सरकारची 3ची पहिल्या दिवशीची कमाई होती फक्त 2 कोटी रुपये. आणि 19 मेपर्यंत ही कमाई जेमतेम पोचली 32.24 कोटी. अलिकडे रिलीज झालेले ‘हिंदी मीडियम’ची पहिल्या दिवशीची बाॅक्स आॅफिस कमाई होती 2.81 कोटी, तर मेरी प्यारी बिंदूनं पहिल्या दिवशी 1.75 कोटींचा गल्ला जमवला होता. त्याचं गाणं सिनेमापेक्षा जास्त हिट झालेलं थिएटरमध्ये ‘सचिन सचिन’चा नारा अजून बराच काळ ऐकायला मिळणारेय. आणि क्रिकेटप्रमाणे सिनेमातही सचिन रेकार्डस् करणार हे नक्की.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या