JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोनू सूद चिंतेत, ट्विट करत म्हणाला ...

Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सोनू सूद चिंतेत, ट्विट करत म्हणाला ...

Russia-Ukraine War: बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) सोनू सूदने (Sonu Sood) रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान (Russia-Ukraine War) युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह सुमारे 18,000 भारतीयांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 25 फेब्रुवारी-   बॉलिवूड अभिनेता   (Bollywood Actor)  सोनू सूदने  (Sonu Sood)  रशिया आणि युक्रेनमधील युद्धादरम्यान   (Russia-Ukraine War)  युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसह सुमारे 18,000 भारतीयांबद्दल चिंता व्यक्त केली आहे. याठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सरकारने पर्यायी मार्ग शोधावा, असे आवाहन अभिनेत्याने केले आहे. यासोबतच अभिनेत्याने अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे. अभिनेत्याचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. त्याच्या ट्विटवर लोक सतत प्रतिक्रिया देत आहेत. सोनू सूद ट्विट- सोनू सूदने ट्विट करत लिहिलं आहे- “युक्रेनमध्ये अडकलेल्यांमध्ये 18000 भारतीय विद्यार्थ्यांसह अनेक कुटुंबे आहेत. मला आशा आहे की सरकार त्यांना परत आणण्यासाठी सर्व वाजवी प्रयत्न करतील. परंतु मी अजूनही भारतीय दूतावासास तेथे अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर शोधण्याचे आणि त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग शोधून काढण्याची विनंती करतो. सोनू सूदचे ट्विट व्हायरल होताच त्याचे चाहते आणि सोशल मीडिया युजर्सनी त्याच्याकडे मदतीची याचना सुरू केली आहे. या ट्विटवर कमेंट करत एका युजरने लिहिलं आहे, ‘कृपया मदत करा’, ‘तुम्ही देवदूत आहात, कृपया मदत करा’, ‘आमच्यासाठी विमान पाठवून द्या सर’ अशी भावनिक साद या कमेंटमधून घालण्यात आली आहे. युक्रेनमधील विविध शहरांतील विद्यापीठांमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी ठिकठिकाणी अडकले असून, त्या ठिकाणी भीतीचे वातावरण आहे. त्यापैकी बहुतांश वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आहेत.

संबंधित बातम्या

सोनू सूद मनोरंजनसृष्टीत त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या सोशल वर्कसाठी ओळखला जातो. गरीब आणि गरजू लोकांसाठी तो एखाद्या देवदूतपेक्षा कमी नाही. गेल्या दोन वर्षांत सुरू असलेल्या कोविड-19 महामारीदरम्यान त्याने हजारो लोकांना मदत केल्याबद्दल त्याचे प्रचंड खूप कौतुक झाले आहे. अभिनेत्याचे चाहते त्याला ‘रिअल हिरो’ म्हणतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या