40 वर्षांच्या रियाकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज कोणीच लावू शकत नाही, ती वयापेक्षा खूपच तरुण दिसते. (फोटो साभारः Instagram @riyasendv)
रिया सेन अलिकडच्या काळात चित्रपटांपेक्षा जास्त सोशल मीडियावरच चर्चेत राहिली. तिचे बोल्ड फोटो हे त्यामागचं कारण.
काही दिवसांपूर्वी टॉपलेस फोटोशूट केल्यामुळे रिया चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा तिने बोल्ड फोटो शेअर करत नव्या सिनेमाविषयी सांगितलं आहे.
रिया सेन सध्या उत्तराखंडच्या रामनगरध्ये एका रहस्यपटाचं शूट करत आहे. तो एक मर्डर मिस्ट्री थ्रिलर असल्याचं समजतं.
डेथ टेल नावाच्या या हिंदी रहस्यपटाचं शूटिंग उत्तराखंडला सुरू असल्याचं रियाने स्वतःच सांगितलं आहे. जॉयदीप बिस्वास यांचा हा चित्रपट आहे.
रिया सेनने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. रियाचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. (फोटो साभारः Instagram @riyasendv)
इन्स्टाग्रामवर रिया सेनचा हा बोल्ड लुक सर्वांनाच आवडत आहे. या फोटोंवर रियाला लाखो लाईक्स मिळाल्या असून चाहते तिच्या फोटोंवर सतत करतानाही दिसत आहेत.
रिया सतत तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फोटो शेअर करत असते. तिच्या नवीन फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.
इन्स्टाग्रामवर रिया सेनच्या चाहत्यांची कमी नाही. तिला इन्स्टाग्रामवर 14 लाखाहून अधिक लोकं Follow करतात.