JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रितेश-जेनेलियाचं 'वेड'; पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चाहत्यांना दिली जबरदस्त बातमी

रितेश-जेनेलियाचं 'वेड'; पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चाहत्यांना दिली जबरदस्त बातमी

जेनेलिया आणि रितेश देशमुख आज बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. कायमच ते सोशल मीडियावर सक्रिय असलेले पहायला मिळतात.

जाहिरात

रितेश देशमुख

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 ऑक्टोबर : जेनेलियानं 2003 मधे ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं. या चित्रपटात जेनेलियासोबत अभिनेता रितेश देशमुखनं मुख्य भूमिका साकरली होती. दोघांनी बऱ्याच चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. जेनेलिया आणि रितेश देशमुख आज बॉलिवूडचे क्यूट कपल म्हणून ओळखले जातात. कायमच ते सोशल मीडियावर सक्रिय असलेले पहायला मिळतात. अशातच दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी दिवाळी पाडव्याचे औचित्य साधत चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. रितेश देशमुखने त्याचा आगामी चित्रपट ‘वेड’ च्या पोस्टरचे अनावरण केले आहे. पोस्टर शेअर करत रितेशनं एक लक्षवेधी कॅप्शनही लिहिलं आहे. ‘वेडेपणा करायला मुहूर्त नसतो पण केलेला वेडेपणा एखाद्या मुहूर्तावर जाहिर करायला काय हरकत आहे! आज दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छांसकट सादर करतोय तारिख आणि चित्रपटाचा फर्स्ट लुक. आमचं वेड तुमच्यापर्यंत येतंय 30 डिसेंबरला. तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असू द्या. ‘, असं रितेश म्हणाला.

संबंधित बातम्या

‘वेड’ चित्रपटातून रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनं केलं असून तो आणि जेनेलिया मुख्य भुमिकेत झळणार आहे. वेड चित्रपटातून अभिनेत्री जेनेलिया देशमुख मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. खूप काळानंतर जेनेलिया मोठ्या पडद्यावर पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. आता दोघांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत. दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर ही गुडन्युज शेअर करत रितेश आणि जेनेलियाने त्यांच्या चाहत्यांना एक खास असं दिवाळी गिफ्ट दिलंय असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान, रितेश आणि जेनेलियाच्या आगामी चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाच सलमान खानही पहायला मिळणार आहे. त्यामुळे तर चाहते या चित्रपटाची आणखीनच आतुरतेनं वाट पाहत आहेत. प्रेम कहाणी आणि थ्रिलर या आशयाचा चित्रपट असेल, असा अंदाज पोस्टरवरुन लावला जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या