अभिनेत्री रिया चक्रवर्ती सतत सोशल मीडियावर ट्रोल होत असते. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीवर अनेक आरोप लागले होते. त्यांनतर सतत तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती सतत सोशल मीडियावर ट्रोल होत असते. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्रीवर अंक आरोप लागले होते. त्यांनतर सतत तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.
नुकताच इन्स्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर रियाचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती अगदी धार्मिक अंदाजात दिसून येत आह.
या फोटोंमध्ये रिया चक्रवर्ती मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेताना दिसत आहे. फोटोमध्ये रिया देवासमोर नतमस्तक झाली आहे.
तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती एका गरीब महिलेला काहीतरी देऊ करत आहे. हे सर्व पापाराझींनी आपल्या कॅमेरात कैद केलं आहे.
मात्र हे फोटो समोर येताच रिया चक्रवर्ती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल होऊ लागली आहे.सुशांत सिंह राजपूतचे चाहते मोठ्या प्रमाणात रियाला ट्रोल करत आहेत.
मोठ्या प्रमाणत कमेंट करत युजर्सनी 'तुझं पाप इतकं मोठं आहे, ते मंदिरात जाऊन आणि गरिबांना मदत करून धुतलं जाणार नाहीय', तसेच तुझं काम चांगलं तेव्हा वाटलं असतं जेव्हा तू काही चांगलं केलं असतंस, तर अनेकांनी तिला दिखावा म्हटलं आहे, तर एकाने तिला फोटोग्राफरसोबत घेऊन गेली होतीस का असा प्रश्नसुद्धा विचारला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक गंभीर आरोप लागले होते. तसेच तिला ड्रग्स प्रकरणात जेलमध्येसुद्धा जावं लागलं होतं.