अभिनेत्री रेणुका शहाणे नेहमीच काही ना काही करणाने चर्चेत असतात. विशेषतः महिलांबाबत कोणत्याही विषयावर त्या स्पष्टपणे आपली मतं मांडतात. अशा या स्पष्टवक्त्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस.
अभिनेत्री रेणुका शहाणे नेहमीच काही ना काही करणाने चर्चेत असतात. त्यांच्या स्पष्ट स्वभावामुळे अनेकदा त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. विशेषतः महिलांबाबत कोणत्याही विषयावर त्या स्पष्टपणे आपली मतं मांडतात. अशा या स्पष्टवक्त्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस.
रेणुका शहाणे आणि 90 दशकतील अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या दोघीही चर्चेत आल्या आहेत त्या सुचित्रा यांच्या एका ट्विटमुळे.
सुचित्रा या सुप्रसिद्ध सिनेनिर्माता शेखर कपूर यांच्या पत्नी असून नुकतच त्यांनी वेश्या आणि गुन्हेगार यांची तुलना करणारं ट्विट केलं होतं. रेणुका यांनी यावर प्रतिक्रिया देत सुचित्रांना या दोघांतील फरक समजावून सांगितला.
सुचित्रांनी लिहिलं, आई खरं सांगायची पैसा म्हणजे सर्वकाही नसतं. कारण तो वेश्या आणि गुन्हेगार दोघांकडेही असतो. जर कोणती गोष्ट आयुष्यात महत्त्वाची असेल तर ती माणसाचं चारित्र्य आणि स्वाभिमान आणि मी आज याचा खरा अर्थ समजू लागले आहे. मात्र हे ट्विट पाहिल्यावर रेणुका शहाणे भडकल्या.
रेणुका यांनी गुन्हेगार आणि वेश्यांमधील फरक सुचित्रा यांना समजावून सांगताना ट्विट केलं. त्यांनी लिहिलं, गुन्हेगार आणि वेश्या यांच्यात तुलना करणं चुकीचं आहे कारण वेश्या ती गोष्ट विकतात जी त्यांची आहे मात्र अपराधी फक्त लोकांकडून सर्व गोष्टी बळकावण्याचं काम करतात. मी तुमच्या आईचा आदर करते. पण वेश्या आणि अपराधी खूप वेगवेगळे आहेत.
आपल्या आणखी एका ट्विटमध्ये त्या सांगतात, वेश्यांना अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. त्यांना जबरदस्तीनं नशा करायला लावली जाते. त्यांना मारलं जातं. तसेच हार्मेनल इंजेक्शन दिली जातात. एवढ झाल्यावर त्यांच्या कमाईतील अर्धा अधिक भाग दलाल घेतात. मात्र गुन्हेगारांचं असं नसतं त्यांना गुन्हा केल्यानंतरही संसद आणि उद्योगांमध्ये मोठं स्थान मिळतं
रेणुका शहाणेंनी अशाप्रकारे आक्रमक पवित्रा घेतल्यावर मात्र सुचित्रा यांनी माफी मागत आपली चूक मान्य केली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते एम जे अकबर यांनी 'मैं भी चौकीदार' असं ट्विट केलं होतं यावर रेणुकांनी, तुम्ही चौकीदार असाल तर मग या देशात कोणतीच महिला सुरक्षित नाही अशी प्रतिक्रिया दिली होती.
फक्त बॉलिवूडच नाही संपूर्ण देशाला ढवळून काढलेल्या मी टू मोहिमेत एम जे अकबर यांचं नाव आल्यानंतर रेणुकांनी त्यांच्यावर टीका केली होती. या मोहिमेत अंतर्गत जवळपास 20 महिलांनी अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर अकबर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या 'मैं भी चौकीदार' ट्विटवर रेणुका यांची प्रतिक्रिया पाहिल्यावर आता सर्वजण 'मैं भी चौकीदार' ट्विट करताना विचार करु लागले आहेत.